loader
Breaking News
Breaking News
Foto

दिग्विजय बागल यांनी कृषीमंत्री दादा भुसे व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन केल्या महत्वपूर्ण मागण्या

शिवसेनेचे युवा नेते व मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल हे सध्या तालुक्याचा दौरा करत आहेत व या दौर्‍यादरम्यान नागरीकांनी बोलुन दाखवलेल्या अडचणी व प्रलंबित प्रश्नावर तात्काळ संबंधीत मंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांना रितसर निवेदन देवुन प्रश्नावर लक्ष घालण्याची विनंती करत आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मागील आठवड्यात कुकडीच्या पाण्याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची त्यांनी भेट घेऊन कुकडी च्या पाण्यासंदर्भात मागणी केली होती.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आज कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन, त्यांनी खते व उडीद बियाण्यांच्या लिकिंग बाबत निवेदन देऊन शेतकऱ्यांची व्यथा थेट कृषी मंत्र्याच्या दरबारात पोहचवली आहे तसेच सिना कोळेगाव परिसरातील धरणग्रस्त बांधवांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल्या प्रश्नावर पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना अभ्यासपूर्ण निवेदन सादर केले आहे .या वेळी दोन्ही खात्याच्या मंत्र्यांनी दिग्विजय बागल यांच्या निवेदनाची दखल घेऊन योग्य तो कार्यवाही करण्याच्या सुचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला असुन तात्काळ अवहाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

जनसंपर्क दौर्‍याच्या माध्यमातून येणाऱ्या प्रश्नावर दिग्विजय बागल तात्काळ संबंधीत मंत्र्यां पर्यंत समस्या पोहचवुन पाठपुरावा करत असल्याने नागरिकांकडून दिग्विजय बागल यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts