loader
Breaking News
Breaking News
Foto

ओढ्याच्या पुरात वाहून गेली होती कार, तिघांचा झाला होता मृत्यू वर्ष झाले तरी परस्थीती जैसे थे!

करमाळा तालुक्‍यात १४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जेऊर लव्हे रस्त्यावर आसलेल्या पुलाला पुर आला होता या पुलावरून एक कार वाहून गेली होती. वाहून गेलेल्या कार मध्ये बाप-लेका सह ड्रायव्हर चा पाण्यात बुडून मृत्यु झाला होता. या पुलासह जेऊर येथील भिमनगर ,जेऊर कोंढेज रस्त्यावर असलेल्या पुलाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन हे पुल प्रचंड धोकादायक बनले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मन सुन्न करणाऱ्या या घटनेस एक वर्ष पुर्ण होत आले तरी देखील या पुलांच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे, साईड गार्ड, बसवने, वाहुन गेलेल्या जागेवर भराव टाकणे आशी कामे तात्काळ होणे अपेक्षित होते मात्र तिन जणांचा जिव जावुन देखील प्रशासन वेळ काढुपणा करत असल्याने आणखी जिव गेल्यावरच प्राशसन जागे होणार आहे का? असा सवाल देखील विचारला जात आहे .अतिवृष्टीत वाहुन गेलेले रस्ते,पुल यासाठी शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा देखील केली होती मात्र या घटनेचे गांभीर्य बांधकाम विभागाने घेतलेले दिसत नाही.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

गेल्या वर्षा पेक्षा या वर्षी पावसाची शक्यता आधीक वर्तविली जात आहे ,त्या मुळे धोकादायक पुलांची दुरुस्ती तात्काळ होणे गरजेचे आहे .जेऊर हे व्यापारी दृष्टिकोनातून महत्वाचे आहे तसेच रेल्वे स्थानक देखील जेऊर येथे असल्याने जेऊर कोंढेज या पुलावरून या परिसरातील सौंदे ,वरकटणे,कोंढेज, व लव्हे पुलावरून निंभोरे,मलवडी,केम घोटी या परिसरातील नागरिक येजा करत असतात तसेच चिखलठाण ते सालसे मार्गे जाणारी एसटी देखील याच धोकादायक पुलावरून धावत असते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दुसरी दुर्घटना होण्याअगोदर तात्काळ या पुलांची दुरुस्ती करावी आशी मागणी नागरिकांतून होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts