loader
Breaking News
Breaking News
Foto

नोटीसाची होळी ,आमदार शिंदेच्या नावाने शिमगा ! पोलीसांकडून कारवाईचा बडगा?

करमाळा माढा विधान सभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांना विठ्ठल कार्पोरेशन च्या वतीने खतं देतो म्हणून उतारे गोळा केले व शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचे बोगस कर्ज उचलले आहे आसा आरोप करत या विरोधात शेतकरी नेते अतुल खुपसे यांनी सर्वप्रथम आंदोलन उभा करून एल्गार पुकारला आहे. पुणे येथील पंजाब नॅशनल बँके समोर अर्धनग्न व भिखमांगो आंदोलन करुन राज्यभर हा मुद्दा चर्चेत आणला आहे. एकीकडे खुपसे आंदोलनाची धार तिव्र करत आसतानाच तालुक्यातील शिंदे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी व विरोधक शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील व शिवसेनेचे युवा नेते मकाई चे चेअरमन दिग्विजय बागल यांनी देखील शिंदे यांना या प्रश्नावर कोंडीत पकडण्यास सुरवात केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शिवसेना माजी आमदार नारायण पाटील हे आमदार शिंदे यांच्या बोगस कर्ज प्रकरणावरुण प्रंचड आक्रमक झाले असून त्यांनी या घोटाळ्याचे सर्व पुरावे गोळा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे देखील सांगीतले आहे.त्याच बरोबर शिंदे यांनी एकरकमी सेटलमेंट करुन कर्ज न भरता शेतकऱ्यांना नव्याने कर्ज काढण्यास अडथळे येऊ नयेत याची काळजी घ्यावी अन्यथा न्यायालयात जाऊ असा इशारा दिला आहे . या आंदोलनाचे लोण आत्ता गावोगावी पोहचले असुन फसवणुक झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र एवुन बँके मार्फत आलेल्या कर्ज नोटीसांची होळी करुन आमदार शिंदे यांच्या नावे शिमगा करण्यास सुरवात केल्याने शिंदे यांच्या विरोधात रोष वाढत चालला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

शेतकऱ्यांनी बेकायदेशीर व परवानगी न घेता हे आंदोलन केल्याने पोलीसांकडून आवाटी येथील शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन कारवाई करण्याची ताकीद दिली असल्याची चर्चा आहे .त्या मुळे पोलीसांच्या माध्यमातून हे आंदोलन दाबले तर जात नाही ना ? आशी चर्चा आत्ता सुरु झाली असून आमदार शिंदे यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा आशी मागणी शेतकऱ्यांतुन जोर धरत आहे मात्र बोगस कर्ज प्रकरणाचा मुद्दा तापल्या पासुन आमदार शिंदे यांचा करमाळा दौरा बंद असल्याची चर्चा आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा तालुक्यातील तिस ते चाळीस गावात शेतकऱ्यांनी नोटीसांची होळी करुन निषेध व्यक्त केला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts