करमाळा पंचायत समितीचे विद्यमान सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे सोपवला असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून समजली आहे. जिल्हापरिषद अध्यक्ष कांबळे यांनी सभापती ननवरे यांच्या राजीनाम्या बाबत मंजुरीची शिफारस करून राजीनामा जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठवला असल्याचे खात्रीलायक वृत्त असुन जिल्हाधीकारी हे राजीनामा मंजूर करून नवीन सभापती निवडीची तारीख कधी जाहीर करणार ?या कडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.ननवरे यांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी सभापती पदाचा कार्यभार स्विकारला होता त्या आगोदर उपसभापती म्हणून अडीच वर्ष कार्यकाळ गाजवला आहे .
सध्या पंचायत समितीतीत शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांची सत्ता असुन १० सदस्य संख्या असलेल्या या सभागृहात शिवसेनेच्या चिन्हावर (पाटील गट) निवडणूक जिंकलेले ०६ , काँग्रेस च्या चिन्हावर ०१ (जगताप गट) राष्ट्रावादी ०२ (बागल गट) तर अपक्ष ०१ अशी सदस्य संख्या आहे . शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झालेल्या जयाबाई दत्तात्रय जाधव या सध्या आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाचे काम करत आहेत तर राष्ट्रवादीच्या एक महिला सदस्या मागील सभापती उपसभापती निवडी पासुन नारायण पाटील (शिवसेना) यांच्या गटासोबत आहेत अपक्ष विजयी झालेले राहुल सावंत हे आमदार संजयमामा शिंदे समर्थक आहेत.
माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी माझ्यावर विश्वास टाकून उपसभापती/ सभापती पदावर काम करण्याची संधी दिल्याने ग्रामीण भागात घरकुल योजना, पथदिवे, बंदिस्त गटारी, पाणीपुरवठा,स्वच्छता अभियान,कृषीयोजना इत्यादी ग्रामविकासाला चालना देणाऱ्या योजना प्रभावी पणे राबवून तालुक्याच्या विकासासाठी योगदान देवु शकलो, माझ्या कालावधीत झालेल्या कामांविषयी मी समाधानी असुन ,स्वतःहून सभापती पदाचा राजीनामा माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या कडे सुपूर्द केला आहे . या संदर्भात ते जो आदेश देतील तो मान्य आहे असे करमाळा पंचायत समीतीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी सा चौफेर शी बोलताना सांगीतले
गत पंचायत समिती निवडणूकांवेळी नारायण पाटील (शिवसेना)जयवंतराव जगताप (काँग्रेस) यांनी युती करुन तर बागल (राष्ट्रवादी) स्वतंत्र व संजयमामा शिंदे यांनी अपक्ष पॅनेल उभा करुन निवडणूका लढवल्या होत्या . सभापती पदासासाठी पाटील गटाकडून डबल उपमहाराष्ट्र केसरी पै अतूल पाटील, पै दत्ता सरडे यांची नावे चर्चेत आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.