loader
Breaking News
Breaking News
Foto

सभापती गहिनीनाथ ननवरे यांचा सभापती पदाचा राजीनामा !

करमाळा पंचायत समितीचे विद्यमान सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे सोपवला असुन अध्यक्ष यांनी मंजुरीची शिफारस करून राजीनामा जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठवलाला असल्याचे खात्रीलायक वृत्त असुन जिल्हाधीकारी राजीनामा मंजूर करून नवीन सभापती निवडीची तारीख कधी जाहीर करणार ? या कडे लक्ष राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सध्या पंचायत समितीतीत शिवसेना माजी आमदार नारायण पाटील यांची सत्ता असुन या पंचायत समितीतीत दहा सदस्य संख्या असलेल्या या सभागृहात शिवसेनेच्या चिन्हावर (पाटील गट) निवडणूक जिंकलेले ०६ , काँग्रेस च्या चिन्हावर ०१ (जगताप गट) राष्ट्रावादी ०२ (बागल गट) तर अपक्ष ०१ अशी संख्या आहे .

विद्यमान सभापती ननवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माजी म्हटले आहे की माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी मला कमी कालावधीत उपसभाती सभापती पदावर काम करण्याची मोठी संधी दिली होती या माध्यमातून तालुक्यातील विविध प्रश्न सोडवण्यास व विकास कामे करण्याचे काम केले आहे . दिलेल्या संधीवर समाधानी असुन स्वतःहून माजी आमदार नारायण पाटील यांच्याकडे मि राजीनामा सोपवला आहे असे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

शिवसेनेच्या चिन्हावर विजयी झालेल्या जयाबाई दत्तात्रय जाधव या सध्या आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटाचे काम करत आहेत तर राष्ट्रवादीच्या एक महिला सदस्या मागील सभापती उपसभापती निवडी पासुन नारायण पाटील (शिवसेना) यांच्या गटासोबत आहेत अपक्ष विजयी झालेले राहुल सावंत देखील आमदार संजयमामा शिंदे समर्थक आहेत. गत पंचायत समिती निवडणूकांवेळी नारायण पाटील (शिवसेना)जयवंतराव जगताप (काँग्रेस) यांनी युती करुन तर बागल (राष्ट्रवादी) स्वतंत्र व संजयमामा शिंदे यांनी अपक्ष पॅनेल उभा करुन निवडणूका लढवल्या होत्या . सभापती पदासासाठी पाटील गटाकडून डबल उपमहाराष्ट्र केसरी पै अतूल पाटील, पै दत्ता सरडे यांची नावे चर्चेत आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

कोवीड पार्श्वभूमीवर जिल्हाधीकारी निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलणार का? सभापती निवड जाहीर झाल्यास राजकीय नवीन समीकरणे घडून नाट्यमय परस्थीती घडणार का? पाटील गट (शिवसेना) आपले वर्चस्व आबाधीत ठेवणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts