loader
Breaking News
Breaking News
Foto

सावडी येथील युवकांचा स्तुत्य उपक्रम ! स्नेहा ग्रुप ठरतोय गावसाठी आधार.

राजकीय जोडे बाजुला ठेवुन एकत्र आल्यास युवक गावासाठी खुप काही सहकार्य करु शकतात याचे उत्तम उदाहरण सावडी येथील युवकांनी दाखवुन दिले आहे .नोकरी ,व्यवसाय शिक्षणा निमित्त गावपासुन दुर म्हणजेच पुणे मुंबई येथे स्थायिक असलेल्या युवकांनी हा ग्रुप स्थापन करून या ग्रुपच्या माध्यमातून गावाबरोबर असलेली 'नाळ ' व सामाजिक जाणीव जोपासण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

नुकताच स्नेहा ग्रुप कडून कोविड काळात जे दहा रुग्ण सेवकांनी गावात कोवीड केअर सेंटर मध्ये काम करत होते त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये असे दहा लाख रुपयांच्या मेडिक्लैम विमा पॉलिसी वाटप केले आहे तसेच गावामध्ये निसर्ग पूर्वक झाडे लावणे, करोना काळामध्ये गरजू कुटुंबास धान्य वाटप, करोना गरजू रुग्णांसाठी आर्थिक मदत,असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्यपूर्ण राबवून कोरोना काळात गावासाठी मोलाचे सहकार्य केले आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बहुमूल्य वेळ व मार्गदर्शन देऊन गावाच्या विकास कामात हातभार लावतात आपली माती आपली माणसं आपली जबाबदारी हे ग्रुपचे ब्रिद वाक्य सत्यात उतरवले आहे. या ब्रिद वाक्यानुसारच असेच अविरत संघटित होऊन काम करू असा संकल्प या ग्रुप मधील सदस्यांनी केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

.यावेळी स्नेह ग्रुपचे सदस्य श्री अमोल बबन एकाड(CISF), दिगंबर महादेव मचाले,ज्ञानेश्वर विठ्ठल पुंडे प्रत्यक्ष उपस्थित होते तर डॉ.नवनाथ जाधव, तलाठी श्याम वालेकर भाऊसाहेब, आनंद अब्बड,केशव शेळके ,राम पुंडे, नवनाथ शिंदे,आजिनाथ चव्हाण, दादासाहेब काकडे इ.गुगल मिटच्या माध्यमातून लाईव्ह होते. दिगंबर मचाले यांनी प्रस्तावना केली यावेळी वालेकर भाऊसाहेब, डॉ.नवनाथ जाधव, आनंद अब्बड यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि श्री हिराभारती महाराज कोवीड सेंटर करत असलेल्या कामाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या तर भाऊसाहेब शेळके यांनी सर्व सावडी स्नेह ग्रुप सदस्यांचे आभार मानले व त्यांनी केलेल्या मदतीमुळे आम्हा सेवकांना आधार मिळाला व आमचे मनोबल वाढले असून आम्ही इथून पुढेही असेच सामाजिक कार्य करू आणि आम्हाला असेच सहकार्य लाभावे आशी अपेक्षा व्यक्त केली.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts