loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार संजय शिंदे यांचे समर्थक म्हणजे 'आलिबाबा 'च्या टोळीचे चेले - राजाभाऊ कदम

शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढणारे आमदार संजय शिंदे यांचे समर्थक म्हणजे आलिबाबा च्या टोळीचे चेले असल्याचा घणाघात बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रका द्वारे केला आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कदम यांनी म्हटले आहे की राजकीय विश्वासार्हता संपलेल्या टोळीकडून अलिबाबाच्या समर्थनाची चाललेली स्पर्धा म्हणजे करमाळा तालूक्याच्या राजकारणातील सर्वात किळसवाणा प्रकार आहे, आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामन बदे यांनी नुकतेच आ. संजय शिंदे यांनी शेतकऱ्याची कागदपत्रे वापरुन परस्पर कर्ज काढल्याच्या कृतीचे समर्थन केले आहे याचा राजाभाऊ कदम यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे . याबाबत बोलताना कदम म्हणाले की, आज आदिनाथ कारखाना पर जिल्ह्यातील व्यक्तीला चालवण्यासाठी दिला जातोय. आदिनाथ कारखान्यावर हि वेळ काही एका दिवसात नाही आली तर अनेक वर्ष या कारखान्याची चुकीचे कामकाज करुन अनेकांनी वाताहत लावली. यात माजी चेअरमन वामन बदे यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकर्‍यांच्या हिताचा ज्यांनी कधीच विचार केला नाही ते आज आमदार संजय शिंदे यांची पाठराखण करत आहेत. शेतकर्‍यांच्या परस्पर ज्या आमदार संजय शिंदे यांनी कोट्यवधी रुपये कर्ज काढले त्यांना बहुतेक वामन बदे यांनीच मार्गदर्शन केले असावे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

-शिष्याची हि जोडी एकत्र असल्यावर जिल्ह्यातील काय घेऊन बसलात तर राज्यातील शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या नावावर कर्ज काढायला मागे पुढे पाहणार नाहीत. मी शेतकऱ्याला त्याच्या ऊसाचे दाम मिळावे म्हणून कित्येक आंदोलने केली. साखर कारखानदार कशा पध्दतीने काम करतात याचा मला चांगलाच अभ्यास आहे. यामुळे आता ह्या अलिबाबाच्या टोळीचा पर्दाफाश करण्याची हि वेळ आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाजूने उभारण्याचे सोडून जी मंडळी आज आमदारांनी केलेल्या चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत आहेत त्यांना जनता कधीच माफ करणार नाही. करमाळा सोडा आता तर बार्शी, मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर सुध्दा विठ्ठल कार्पोरेशन लि या कारखान्याने परस्पर कर्ज काढले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

असं म्हणतात की दाल मे कुछ काला है. पण इथे तर संपूर्ण दाल काळी आहे. जर शेतकऱ्यांच्या नावावरचे कर्ज संपूर्ण व्याजासह विठ्ठल कार्पोरेशन लि या कारखान्याने भरले नाही तर बहुजन संघर्ष सेना आपले पुढील आंदोलन हे म्हैसगाव ता माढा येथे कारखान्याचे गेट समोर करणार असल्याचा इशारा यावेळी राजाभाऊ कदम यांनी दिला.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts