विरोधकांनी २०२४ च्या विधानसभेचे स्वप्न सुद्धा पाहु नये असा टोला माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष वामनदादा बदे यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रका द्वारे बागल -पाटील यांना लगावला आहे.
सध्या आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर उचललेल्या कर्ज प्रकरणावरुण माजी आमदार नारायण पाटील व मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल हे टिका करत असले तरी तो 'पुतणा मावशीचा पान्हा' असुन आगामी निवडणुका डोळ्यांसमोर सुरु केलेली कोल्हेकुई असल्याचा देखील हल्लाबोल बदे यांनी केला आहे.
विरोधकांनी २०२४ च्या विधानसभेचे स्वप्न सुद्धा पाहु नये आमदार संजयमामा शिंदे हे शेतकरी हिताचे योग्य निर्णय घेतात हे कर्ज ते स्वतः फेडणार आहेत मात्र प्रथम पुर्वी ज्यांनी कारखाने चालवले आहेत व चालवत आहे त्यांनी काय दिवे लावलेत सर्व जनतेला माहीत आहे ते उघडया डोळयाने पाहिले आहे म्हणुनच जनतेने त्यांना घरी बसवले आहे त्यामुळे मोकळी उठाठेव करण्यापेक्षा उणेदुणे काढून शिंदें यांना काही फरक पडणार नाही ज्यांनी आता सध्या कारखाने तालुक्यातील डबघाईला आणले आहे त्यांनी तर चकार शब्द काढुनये,असे ही बदे म्हणाले आहेत आ शिंदे यांनी तालुक्यात अनेक रस्ते,आरोग्य उपकेंद्र, शाळा खोल्या बहुसंख्य ग्रामपंचायतला निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे विरोधकांनी आता २०२४ चे स्वप्न सुध्दा आमदारकीचे पाहु नये असेही अखेर आदिनाथचे माजी चेअरमन जिल्हापरिषद चे माजी उपाध्यक्ष वामन बदे यांनी सांगितले
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.