loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी सरपंच वसंतराव चांगण यांचे निधन

कोंढेज (ता.करमाळा) येथील माजी सरपंच व माजी सचिव वसंतराव दगडू चांगण (वय-८०) यांचे वृध्दपकाळाने राहत्या घरी दि.१८ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे. सचिव राजेंद्र चांगण,रेल्वे अधिकारी हिरालाल चांगण,व रेशन दुकानदार जवाहरलाल चांगण यांचे ते वडील होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

वसंतराव चांगण हे १९८६ ते १९९१ या कालावधीत कोंढेज गावचे बिनविरोध सरपंच होते . त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढेज गावची पहिल्यांदाच बिनविरोध निवडणुक पार पडली होती .तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव म्हणून त्यांनी ३२ वर्ष सेवा केली आहे . सचिव म्हणून कोंढेज, पाथर्डी, निंभोरे ,मलवडी,या गावच्या सोसायटीचे कामकाज पाहिल्यांने या परिसरातील अनेक शेतकऱ्यांशी त्यांचे शेवटपर्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले

✍ चौफेर प्रतिनीधी

स्वातंत्र्य सैनिक व माजी आमदार नामदेवराव जगताप यांचे ते कट्टर समर्थक होते.जयवंतराव जगताप यांचे सोबतही त्यांनी काही काळ काम केले. आदिनाथाचे संस्थापक कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

एक क्रियाशील सचिव व धाडसी सरपंच म्हणून त्यांची ओळख होती.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts