loader
Breaking News
Breaking News
Foto

वनटाईम सेटलमेंट न करता आमदार संजय शिंदे यांनी कर्जाची संपूर्ण रक्कम भरावी - माजी आमदार नारायण पाटील

आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांची फसवणुक कर्ज काढले आहे मात्र कर्ज भरताना तरी फसवणुक करु नये ,शेतकऱ्यांची पत बँकेत आबधीत राहण्यासाठी एक रक्कमी सेटलमेंट न करता व्याजासह संपूर्ण कर्जाची रक्कम भरावी आशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात द्वारे केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की,कर्ज काढताना शेतकऱ्यांना फसवले, आता कर्ज भरताना तरी शेतकऱ्यांना परत एकदा फसवू नका. अन्यथा शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला न्यायालयात जाणे भाग पडेल, असा सुचक इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी विद्यमान आमदार संजय शिंदे यांना दिला आहे.शेतकऱ्यांना विठ्ठल कार्पोरेशन लि. यांनी कर्ज काढल्यानंतर बँकेकडून मात्र ते कर्ज फेडण्यासाठी नोटीसा आल्यावर करमाळा तालुक्यात खळबळ उडाली.आ.संजय शिंदे यांना आता हे कर्ज फेडणे भाग आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावर बोलताना माजी आमदार नारायण पाटील यांनी शेतकऱ्याची बाजू घेऊन काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. याबाबत बोलताना पाटील यांनी सांगितले की ज्यावेळी बँक एखाद्या शेतकऱ्याला कर्ज थकीत आहे अशी नोटीस पाठवते त्यावेळी सदर शेतकरी हा बँकेत कर्ज रक्कम भरण्यास जातो. तो शेतकरी पुर्ण रक्कम भरु शकत नसेल तर एकरकमी तडजोड म्हणजेच वन टाईम सेटलमेंट करुन संबंधित कर्जाचे व्याज कमी करुन रकमेत कपात करुन बँक कर्जफेड करुन घेते. परंतु सदर शेतकऱ्याला डिफाॅल्टर म्हणून घोषित करते. यामुळे मग तो शेतकरी भविष्यात त्याच बँकेत तर सोडा पण इतर कोणत्याही बँकेत कर्ज घेऊ शकत नाही. तशी माहिती आधारकार्डच्या सहाय्याने इतर बँकाना आपोआपच समजते. यामुळे आज शेतकरी हा घाबरलेला असुन कर्ज फेडले गेले पाहिजे हा एकच उद्देश डोक्यात ठेऊन आहे. या संधीचा फायदा आमदार संजय शिंदे यांनी घेऊन जर बँकेशी वन टाईम सेटलमेंट करुन कर्ज रक्कम भरली तर मात्र शेतकऱ्यांच्या भविष्यावर याचा गंभीर परिणाम होणार आहे. आज आ. संजय शिंदे यांना कर्ज फेडण्याशिवाय पर्याय नाही.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

परंतु त्यांनी वन टाईम सेटलमेंट न करता कर्जाची संपूर्ण रक्कम व्याजासह भरावी व शेतकऱ्याची पत अबाधित ठेवावी. केवळ मी शेतकऱ्याचे नुकसान होऊ नाही देणार असे म्हटले म्हणजे आरोप नष्ट होणार नाहीत. यामुळे आता शेतकऱ्यांनी घाबरु नये. विठ्ठल कार्पोरेशन लि या कारखान्याची स्थावर मालमत्ता जप्त करुन बँक शेतकऱ्यांच्या नावावर काढलेले हे कर्ज वसुल करु शकते. परंतू शेतकऱ्यांनी दक्ष राहुन कर्ज कोणत्या पध्दतीने फेडणार आहात याचे स्पष्टीकरण आ. संजय शिंदे यांना मागावे. अन्यथा आता जर फसवणुक झाली तर भविष्यात मुलामुलींच्या शिक्षण,लग्न,दवाखाना,शेती अगदी कोणत्याही कारणास बँक तर सोडाच पण पतसंस्था व गावातील विविध कार्यकारी सोसायटी सुध्दा कर्ज देऊ शकणार नाही.यामुळे कर्ज फेडणे हि गोष्ट जितकी महत्त्वाची आहे तितकेच कशा पध्दतीने कर्ज फेडले जाणार आहे हि बाब पण तेवढीच महत्त्वाची आहे. याबाबत आपण लवकरच जिल्हाधिकारी यांना भेटुन या प्रकरणी लक्ष देऊन शेतकऱ्यांवरील होणारा अन्याय दुर करण्यासाठी विनंती करणार आहोत. परंतु सध्या आणखी नवीन माहिती बाहेर पडतेय, शेतकरी विविध बँकांकडून आलेल्या नोटीसा मला दाखवत आहे.हि सर्व माहिती संकलीत करुनच आपण पुढील निर्णय घेणार आहोत व वेळप्रसंग पडल्यास न्यायालयात सुध्दा हे प्रकरण दाखल करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts