loader
Breaking News
Breaking News
Foto

यशवंत शिंदे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना राजीनामा मागवा- दिग्विजय बागल, पृथ्वीराज पाटील, शंभुराजे जगताप यांच्याकडून देखील अपेक्षा. -सचिन काळे

करमाळा तालूक्यातील युवा नेत्यांनी म्हणजे आमदार व माजी आमदार पूत्रांनी आता मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले पाहीजे.आशी आग्रही मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक सचिन काळे यांनी व्यक्त केली असुन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचे चिरंजीव यशवंत भैया शिंदे यांनी सुद्धा नैतीक जबाबदारी स्वीकारून अक्रमक झालं पाहीजे प्रसंगी आमदार वडीलांना त्यांनी राजीनामा सुद्धा देन्यास भाग पाडावे .आशी मागणी सचिन काळे यांनी केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

त्याच बरोबर माजी मंत्री दिगंबरराव बागल व माजी आमदार शामलताई बागल यांचे चिरंजीव दिग्विजय बागल यांनी सुद्धा रसत्यावर उतरावे व मराठा आरक्षणासाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांनी आता शांत न बसता मराठा समाजासाठी मोठा लढा उभा करावा असे अवाहन जगताप यांना काळे यांनी केले असुन माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी सुद्धा मराठा अरक्षनाचा मुद्दा लाऊन धरावा आशी अपेक्षा सचिन काळे यांनी व्यक्त केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

वरिल पैकी आमदार व माजी आमदार यांच्या पुत्रांनी मराठा अरक्षणा साठी आपले सर्वस्व पनाला लाऊन काम करावे . अन्यथा मराठा समाजातील युवक व युवती आपनास येनाऱ्या काळात कधीही माफ करनार नाहीत व पुढील राजकारनात ही सहकार्य करनार नाहीत . असे देखील सचिन काळे यांनी स्पष्ट केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts