loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन एफ च्या तालुकाध्यक्ष पदी जयंत दळवी यांची निवड

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन एफ या संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी स्नेहालय न्यु इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मेस्टा एफ या जिल्हा कार्यकारणीची बैठक कुर्डुवाडी येथील आदर्श पब्लिक स्कूल येथे संपन्न झाली आहे या बैठकीला संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हरीश शिंदे सेक्रेटरी तथा जिल्हा अध्यक्ष गणेश निळ उपस्थित होते या प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते दळवी यांना निवडीचे पत्र देण्यात आले होते. तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संतोष वलगे, संपर्क प्रमुख अनंत कळवस,यांचीही निवड करण्यात आली होती. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोगे,अमोल सुरवसे,डॉ ब्रिजेश बारकुंड,रवी सुरवसे , मोहिते सर, मदने सर, गडदे सर ,संभाजी घाडगे, हेमंत बरडे,अनंत कळवस,संतोष वलगे,आदी जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी संस्थापक, मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक निवडीही करण्यात आल्या .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

निवडीनंतर बोलताना नुतन तालुकाध्यक्ष जयंत दळवी म्हणाले की मेस्टा एफ या प्रदेश व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांनी माझ्या वर मोठी जबाबदारी दिली आहे भविष्यात करमाळा तालुका अथवा जिल्ह्यातील स्कूल बाबत खुप काही अडचणी आहेत या अडचणी सोडविण्यासाठी मी निश्चित सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या निवडी बद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातुन दळवी यांचे अभिनंदन होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts