loader
Breaking News
Breaking News
Foto

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी पत्रकार दिनेश मडके

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळ करमाळा तालुकाध्यक्ष पदी पत्रकार दिनेश उध्दवराव मडके यांची जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या आदेशानुसार निवड करण्यात आली आहे.सोलापुर जिल्हयाचे सेवाध्यक्ष शरद मते , जिल्हा निरीक्षक राजेंद्र भुयार यांनी ही निवड केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात नरेंद्र महाराज संप्रदाय वाढीसाठी काम करणार असल्याचे मडके यांनी या वेळी सांगीतले . दिनेश मडके यांनी सात वर्षे तालुकाध्यक्ष म्हणुन चांगले काम केले असुन या कामाची दखल घेऊन त्यांची पुनश्च त्यांची निवड करण्यात आली आहे.कुणबी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष म्हणुन त्यांनी चांगले काम केले असून समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी ते सदैव कार्यरत असतात.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सध्या करमाळा तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत. मराठा समाजात विवाह जमण्याचा प्रश्न गंभीर बनला असून करमाळा तालुक्यात मराठा सोयरीक संघाच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा सोयरीक संघाचे करमाळा तालुकाध्यक्ष म्हणुन ते काम करीत आहेत.विविध सामाजिक चळवळीत ते सक्रियपणे सहभाग असल्याने त्यांना समाजातील सर्व क्षेत्रातील चांगला पाठिंबा मिळाला आहे.त्यांचा जनसंपर्क दांडगा असुन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात संप्रदाय वाढीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

दिनेश मडके यांची करमाळा तालुकाध्यक्ष म्हणुन निवड झाल्याबद्दल शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts