loader
Breaking News
Breaking News
Foto

वीजबील वसुली विरोधात भाजपा अक्रमक ,वीज तोडणी विरोधात जागर आंदोलनाचा इशारा

आघाडी सरकारच्या वतीने लॉक डाऊन नंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना वीज बिलाची वसुलीचे आणि वसुली नाही झाली तर वीज तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या विरोधात भाजपा अक्रमक झाली असून तहसीलदार समिर माने यांना निवेदन देवुन जागर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

निवेदनात म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची उसाची बिले अद्यापही मिळालेली नसताना अगोदरच हतबल झालेला शेतकरी अडचणीत सापडला आहे असे असतानाही सरकारने पुन्हा एकदा वीजबिल वसुलीचे आदेश दिलेले आहेत, ते त्वरित रद्द करावेत

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

याप्रसंगी तालुका सरचिटणीस ,, अमरजीत साळुंखे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, किसान मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान, आरपीआय (A) चे तालुका अध्यक्ष अर्जुन गाडे,रासप तालुकाध्यक्ष अंगद देवकते, संजय गांधी निराधार चे नरेंद्र ठाकूर, महादेव फंड रेल्वे सल्लागार सदस्य दिपक चव्हाण, मकाई कारखान्याचे मा संचालक अमोल पवार, जितेश कटारिय, युवा मोर्चाचे मयूर देवी, संतोष कांबळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

निवेदनातील मागण्या तात्काळ शासना पर्यंत पोहचवल्या जातील असे तहसीलदार समिर माने यांनी भाजप शिष्टमंडळास सांगीतले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts