loader
Breaking News
Breaking News
Foto

बँड बॅन्जो व्यवसायिकांना वाजवण्याची परवानगी द्या -युवराज जगताप

कोरोनाच्या लाॅकडाऊन मुळे आज बँड , बॅन्जो ,वाजंत्री व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली असून जिल्ह्यातील व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका गेल्या दोन वर्षाभरापासून सहन करावा लागत आहे . सध्या सोलापूर जिल्ह्यातील लाॅकडाऊन हटवले असून सर्व दुकाने सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याचे आदेश दिले आहे. परंतु या आदेशामध्ये बँड,बॅन्जो,वाजंत्री व्यवसायाचा कुठल्याही प्रकारचा विचार अथवा उल्लेख केलेला नाही . तसेच या आदेशामध्ये लग्न समारंभास परवानगी दिली आहे . त्यामुळे बँड , बॅन्जो,वाजंत्री , व्यावसायिकांना नियमाप्रमाणे परवानगी द्यावी अशी मागणी बॅन्ड असोसिएशन चे उपाध्यक्ष युवराज जगताप यांनी ईमेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यात त्यांनी म्हटले आहे की बँड ,बॅन्जो,वाजंत्री , डीजे सिस्टीम व्यावसायिकांना इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी मोठ्या ' प्रमाणात अडचण निर्माण झाली असल्यामुळे सदरील व्यावसायिकांना परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळी बॅन्ड असोसिएशनचे इसाक भाई पठाण,नजीर भाई पठाण,मुकतार पठाण, महमद हाफिज कुरेशी,नासीर कुरेशी,मस्तान कुरेशी,पांडुरंग जगताप विशाल लांडगे,गोरख कांबळे उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts