आगामी काळात शहरातील सर्व प्रमुख मार्गासहीत प्रत्येक गल्ली बोळातील रस्ते डांबरीकरण, सिमेंट कॉंक्रीट, व पेव्हींग ब्लाॅक च्या माध्यमातून पुर्ण करणार असून करमाळा शहराचा चेहरामोहरा बदणार असल्याचे प्रतिपादन गराध्यक्ष वैभवराजे जगताप केले आहे. करमाळा शहरात नगरपालिकेच्या विकास कामांचा धडाका.लावला असून महात्मा गांधी पुतळा ते निलजरोड नवीन डांबरी रस्त्याचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचे हस्ते भूमिपूजन झाले त्या वेळेस ते बोलत होते.
शासनाच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शहरांतर्गत विविध रस्त्यांपैकी महात्मा गांधी पुतळा ते निलजरोड या डांबरी रस्त्याचे भूमीपूजन अर्थात शुभारंभ नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या शुभहस्ते तर उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, नगरसेवक. ऍड नवनाथ राखुंडे,डॉ. मनोज कुंभार, संजय पडवळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
करमाळा शहरात शासनाकडून नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विवीध विकास कामांसाठी शासनाच्या नगरविकास खात्याकडून तब्बल १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यापैकी ९ कोटी ७६ लाख ९३ हजार ९०९ रू. निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमधून टप्प्या-टप्प्याने शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण करून पक्के केले जाणार आहेत. त्यामूळे शहर आणखी आकर्षक व सुंदर बनणार आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.