loader
Breaking News
Breaking News
Foto

फेरतपासणीचा आदेश दिल्याने ,भ्रष्टाचाराचा आरोप करणारेच तोंडावर पडतील-सरपंच संगिता साळवे

:सोलापूर जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या जेऊर ग्रामपंचायतीच्या लेखी तपासणी बाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून आक्षेप घेतला गेला असुन तातडीने फेरतपासणी करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा परिषदेस दिले गेले असल्याची अधिकृत माहिती सरपंच सौ संगिता साळवे यांनी दिली. आहे या आदेशा मुळे माजी आमदार नारायण पाटील यांचे वर्चस्व असलेल्या या ग्रामपंचायत सदस्यांना मोठा दिलासा मिळाला असून, तक्रार करणाऱ्यांना हि चपराक समजली जात आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याबाबत अधिक माहिती देताना साळवे यांनी सांगितले की जेऊर ग्रामपंचायतीच्या कार्यालयीन दफ्तराची दि 31 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली. सोलापुर जिल्हा परिषदेच्या कडून तपासणी अधिकारी आर एम साळूंके यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. वास्तविक पाहता तपासणीच्या वेळेस अधिकारी साळूंके यांनी एकतर्फी बाजू घेऊन व पुर्वदुषित राजकीय दृष्टिकोन मनात ठेउन सदर तपासणी अहवाल तयार केला. मी सरपंच असताना मला दफ्तर तपासणीबाबत दुर ठेवले गेले. तपासणी अहवालातही आक्षेप घेतलेल्या कामांची सर्व कागदपत्र आमच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उपलब्ध असताना त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन केवळ दोन तासात तपासणी उरकली गेली. यावर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी आम्हास कारणे दाखवा नोटीस पाठवली पण प्रत्यक्षात आम्हास आमचे म्हणणे तोंडी अथवा लेखी स्वरूपात मांडण्यास संधी दिलीच नाही. सदर अन्याया विरोधात आम्ही मंत्रालयात तक्रार अर्ज दाखल करुन न्याय देण्याची मागणी केली. यावर दि 4 जून 2021 रोजी ग्रामविकास विभाग अपर सचीव यांनी आमचे म्हणणे ऐकून सोलापुर जिल्हा परिषदेस दफ्तराची फेर तपासणी करण्यात यावी असे आदेश दिले असुन सदर तपासणी हि राजकीय द्वेषातुन न करता निःपक्ष पणे करण्यात यावी असे स्पष्ट बजावले आहे. यामुळे आता सोलापुर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष देऊन फेरतपासणी करणे भाग आहे. यामुळे आता भ्रष्टाचार झाल्याची खोटी तक्रार जनतेसमोर पुराव्यानिशी उघडी पडेल.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

गावातील काही तथाकथित व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यानी या प्रकरणाचे राजकीय भागभांडवल करण्याचा प्रकार वेळीच थांबवावा. एक मागासवर्गीय महिला जेऊर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर सक्षमपणे काम करत असताना दफ्तर फेरतपासणी होईपर्यंत चिखलफेक करणे योग्य नाही. जेऊर ग्रामपंचायत हि विकसीत ग्रामपंचायत असुन आम्ही केलेली विकासकामे हि ठळकपणे दिसून येतात.लवकरच फेरतपासणी करण्यात येईल व आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे सरपंच संगिता साळवे यांनी सांगितले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts