loader
Breaking News
Breaking News
Foto

तृप्तीताई साखरे यांच्या प्रयत्नातून राजुरी गावाला २० लाख ५० हजारांचा मंजूर

राजुरी गावच्या दृष्टीने मागच्या चार वर्षापासून अडकून राहिलेल्या विकासकामांना सततचा पाठवपुरावा करून मंजुरी मिळवण्यात यश आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या तृप्ती साखरे यांनी दिली.जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अनिरुद्ध कांबळे यांची जिल्हा परिषदेत तर कधी करमाळा येथे भेट घेऊन राजुरीतील प्रलंबित कामे मंजूर करण्याविषयी विनंती केली असता विविध विकासकामांना जिल्हा परिषद अध्यक्ष श्री अनिरुद्ध कांबळे यांनी मंजुरी दिली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

विकासाच्या दृष्टीने कायम दुर्लक्षित राहिलेल्या राजुरी गावाला मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणण्यात ग्रामपंचायत पुर्णपणे अपयशी ठरत असताना आज स्मशानभुमि संरक्षक भिंत - २.५० लाख गरुडवस्ती समाज मंदीरासमोर पेव्हींग ब्लाॅक -३ लाख राजुरी ते मांजरगाव रस्ता दुरुस्ती १५ लाख. एकुण - २० लाख ५० हजार असा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

राजुरी मांजरागाव रस्ता दुरुस्ती होणार असल्याने पावसाळ्यात होणारा त्रास होणार नाही तसेच दलित वस्ती,आणि स्मशानभूमीत संरक्षण भिंतीचे काम लवकरच होऊन ही कामे मार्गी लागतील अशी माहिती तृप्ती साखरे यांनी दिली.यानंतरच्या काळात वॉटर फिल्टर,दलित वस्तीतील रस्ते,हायमास्ट दिवे,रस्ते दुरुस्ती तसेच वयक्तीक लाभाच्या विविध योजना यांसाठी निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहून गावच्या विकासाला गती देणार असल्याचे तृप्ती साखरे यांनी सांगितले या कामात जि.प सदस्या सविताराजे भोसले,युवा नेते अजितदादा तळेकर यांनी मोलाचं सहकार्य केले असल्याची आभाराची भावना ताईंनी बोलून दाखवली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सरपंच सदस्य नसताना साखरे बहिण भावानी प्रयत्न करुन गावासाठी निधी उपलब्ध करून आणल्या बद्दल ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts