loader
Breaking News
Breaking News
Foto

बावीस कोटी कुठं घेऊन बसलात? शकडो कोटींचे कर्ज उचलले आहे ! वेळ पडल्यास संजय शिंदे यांची पुराव्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार- मा.आ .नारायण पाटील

बावीस कोटी कुठं घेऊन बसलात? आमदार संजय शिंदे यांनी शकडो कोटींचे बोगस कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर उचलले आहे ! वेळ पडल्यास संजय शिंदे यांची पुराव्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा खुलासा माजी आमदार नारायण पाटील यांनी जेऊर येथील पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर उचलल्या बोगस कर्जावरुन शेतकऱ्यांत खळबळ माजली आहे, मात्र आद्यप तालुक्याचे प्रमुख विरोधक असलेल्या शिवसेना माजी आमदार नारायण पाटील किंवा त्यांच्या गटाकडून या प्रकरणावरून शिंदे यांच्या विरोधात एकही वक्तव्य नसल्याच्या मुद्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले आसता माजी आमदार नारायण पाटील म्हणाले की हा फक्त बावीस कोटींचा घोटाळा नसून शकडो कोटींचा घोटाळा असण्याची दाट शक्यता आहे .सध्या फक्त पंजाब नॅशनल बँकेच्या नोटीसा आल्याने हा प्रकार व बोगस कर्जाचा आकडा समोर आला आहे. नोटीसा पोहोच करणाऱ्या पोस्टमन व पोस्ट आधिकाऱ्यांवर दबाव टाकून, शक्य झाल्यास आमीषं दाखवून आणखी बँकेची नोटीस शेतकऱ्यां पर्यंत पोहचु दिल्या जात नाहीत त्यामुळे खरा आकडा समोर आला नाही,त्यामुळे आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करून सविस्तर पुरावे गोळा करणार असून, कारखाना प्रशासना बरोबरच संगनमत करुन शेतकऱ्यां नावावर परस्पर बोगस कर्ज काढण्यास मदत करणाऱ्यां पंजाब नॅशनल बँकेच्या आधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत या मागणीचे पुराव्यासह मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगीतले.

✍ चौफेर प्रतिनीधी

तसेच शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून आलीशान बंगले,फार्महाऊस करोडो रुपयांच्या गाड्या मिरवणाऱ्यावर भविष्यात विश्वास ठेवायचा की नाही याचा देखील विचार करावा आसे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे . सत्तेतुन पैसा ,पैशातुन सत्ता असे समीकरण जुळवणार्यांनी शेतकऱ्यांच्या प्रपंचावर विस्तव ठेवून आपला प्रपंच मोठा करण्याचे पाप करु नये आसा टोला माजी आमदार नारायण पाटील यांनी आमदार संजय शिंदे यांचे नाव न घेता लगावला आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अजितदादा तळेकर,सभापती गहिनीनाथ ननवरे,जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले,बिभिषण आवटे,माजी सभापती शेखर गाडे उपसभापती पै दत्ता सरडे ,पंचायत समीती सदस्य तथा डबल उपमहाराष्ट्र केसरी पै अतुल पाटील, आदिनाथ चे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे,देवानंद बागल, बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम बाळासाहेब पवार, घोटीचे सरपंच सचिन राउत, प्रा सरक सर ,प्रवक्ते सुनिल तळेकर, प्रा चौधरी सर उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts