करमाळा माढा मतदारसंघातील विद्यमान आमदार संजयमामा शिंदे अध्यक्ष असलेल्या विठ्ठल कार्पोरेशन या सहकारी साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या नावावर बावीस कोटी रुपयांचे बोगस कर्ज उचलल्याचे समोर आल्यानंतर शेतकऱ्यांत मोठी खळबळ माजली आहे . शेतकरी नेते अतुल खुपसे यांनी आंदोलन करुन या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर काही शेतकऱ्यांचे कर्ज निल केले आहेत मात्र अजुनही शेकडो शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज बोजा दाखवत आहे.या प्रकरणामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यात आडकाठी येत आहे . शेतकऱ्यांचा या प्रश्नावर अतूल खुपसे यांनी उभारलेल्या आंदोलनास करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील व माढा तालुक्यातील शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे यांचा देखील पाठिंबा मिळणार असल्याने या आंदोलनास व्यापक स्वरूप येवुन शेतकऱ्यांना न्याय मिळेल आशी चर्चा आता सुरु आहे .
आज जेऊर येथील नारायण पाटील यांच्या संपर्क कार्यालयात अतुल खुपसे, संजय कोकाटे व माजी आमदार नारायण पाटील यांच्यात बैठक झाली असून संजय शिंदे यांना कोंडीत पकडण्या बाबत कायदेशीर मार्गाचा देखील अवलंब करण्याचे नियोजन झाले असल्याचे समजते.
या भेटी बाबत अतुल खुपसे व संजय कोकाटे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की ,आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज कारखान्या कडुन निल केले जात आहे मात्र इतर शेतकऱ्यांचे कर्ज, कर्ज माफित बसवण्यासाठी किंवा एकरकमी तडजोड करून कोट्यावधी रुपयांवर गंडा घातला जात आहे. या आगोदर देखील शिंदे परिवारातील कारखान्या मार्फत शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचे बोगस कर्ज उचलुन ते कर्ज माफित बसवुन कोट्यावधी रुपयांची सरकारची फसवणूक केली आहे. त्या मुळे फक्त कर्ज निल करण्या पुरते हे आंदोलन नसुन एकदाही बँकेत न जाता ,शेतकऱ्यांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज देणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर देखील फसवणूकीचे गुन्हे दाखल होईपर्यंत हे आंदोलन सुरु रहाणार आहे. आमच्या आंदोलनात माजी आमदार नारायण पाटील हे प्रत्यक्ष सहभागी होणार नसले तरी त्यांचा आम्हाला संपूर्ण पाठिंबा असुन गरज पडल्यास एकत्रित आंदोलन देखील उभा करु असे ते म्हणाले .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.