जिल्हा नियोजन मंडळाच्या वार्षिक योजना सन २०२०-२१ मधुन करमाळा तालुक्यासाठी ३० कोटी ८८ लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती जि प अध्यक्ष अनिरुध कांबळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी आमदार नारायण पाटील,पं.स सभापती गहिनीनाथ ननवरे,शिवसेना जिल्हा उपप्रमुख महेश चिवटे, युवानेते अजित तळेकर,उपसभापती दत्ता सरडे, जि प सदस्या सवितादेवी राजेभोसले,जि.प.सदस्य बिभीषण आवटे,पं स सदस्य पै अतूल पाटील,शेखर गाडे,गणेश चौधरी,राजाभाऊ कदम,चौधरी सर,धुळाभाऊ कोकरे,देवानंद बागल,जिंतीचे सरपंच संग्रामराजे भोसले आदि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देताना जि प अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले की जिल्हा वा'र्षिक योजना २०२०-२१अंतर्गत करमाळा तालुक्यासाठी विविध योजनांमधुन ९० गावांसाठी ३० कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असुन त्या अंतर्गत जनसुविधा १.५२ कोटी, नागरी सुविधा ६० लाख,तिर्थक्षेत्र विकास ३४ लाख ५० हजार,दलित वस्ती सुधारणा ५ कोटी,अतिवृष्टी रस्तेदुरुस्ती १.४५ कोटी,३०५४ ग्रामीण मार्ग बळकटीकरण १.३०, कोटी,५०५४ इजिमा रस्ते बळकटीकरण ६४ लाख,अंगणवाडी नवीन बांधकाम व दुरुस्ती ६९ लाख ५० हजार,नवीन शाळा खोल्या बांधकाम व दुरुस्ती २.९० कोटी,लघुपाटबंधारे ३.४६ कोटी,पाणीपुरवठा योजनांसाठी ७.९१ कोटी,१५ वा वित्त आयोग ग्रामपंचायत बळकटीकरण ६०लाख, आरोग्य उपकेंद्र बांधकाम व दुरुस्ती २.६६ कोटी,पशुसंवर्धन अंतर्गत पशुवैद्यकिय दवाखाण्यासाठी १.८० कोटी असा,३० कोटी ८८ लाख एवढा निधी करमाळा तालुक्यासाठी मंजुर केला आहे त्याचबरोबर माजी आमदार नारायण पाटील याचे नेतृत्वाखाली व अजित तळेकर यांच्या मार्गदर्शनातुन जिल्हा वार्षिक योजनेतुन जास्तीत जास्त निधी खेचुन आणला असुन त्यामुळे करमाळा तालुक्यातील ग्रामीण मार्ग,इतर जिल्हामार्ग यांची कामे मार्गी लागणार आहेत,अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्त्यांची दुरुस्तीदेखील करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे जनसुविधा व नागरी सुविधा योजनामधुन गटार,स्मशानभुमी,काँक्रेट रस्ते,संरक्षक भिंत,हायमास्ट दिवे, पेविंग ब्लाॅक,ग्रामपंचायत कार्यालय इत्यादिंसाठी निधी उपलब्ध करुन दिला असुन गावांचे सुशोभिकरण होण्यास मदत होणार आहे,पाणीपुरवठा योजनाअंतर्गत गावात पाईपलाईन,पाण्याच्या टाक्या यासाठी भरीव स्वरुपात निधी उपलब्घ केला आहे.लघु पाटबंधारे योजनेमधुन ओढाखोलीकरण व बंधारे बांधण्यात येणार असुन जुन्या बंधार्यांमधे दुरुस्ती करण्यात येणार आहे. आरोग्यविषयक पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी गुळसडी, पाडळी,पांगरे येथे नवीन आरोग्य उपकेंद्र बाधण्यासाठी तर जुन्या आरोग्य उपकेंद्रांची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शाळांचे नुकसान झाले होते अशा ठिकाणी वर्गखोल्यांची दुरुस्ती तर आवश्यक ठिकाणी नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम यासाठी भरीव स्वरुपात तरतुद केलेली आहे.आशी माहीती अनिरुध कांबळे यांनी या वेळी दिली
करमाळा तालुक्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केलेला असुन अजुनही सेस फंडातुन व विविध योजनांतुन करमाळा तालुक्याला झुकते माप दिले आहे. वैयक्तीक लाभाच्या विविध योजनाचा लाभ तालुक्यातील सबंधितानी घ्यावा असे आवाहनही जि.प अध्यक्ष अनिरुध कांबळे यांनी केले आहे. प्रास्ताविक सुनिल तळेकर यांनी केले तर आभार प्रा. अर्जून सरक यांनी मानले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.