loader
Breaking News
Breaking News
Foto

मकाईचा राहिलेला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार! विरोधक चुकिच्या बातम्या पसरवतात परंतु आम्ही शेवटपर्यंत सभासद कर्मचाऱ्यांच्या पाठिशी -दिग्विजय बागल

मकाई ची उर्वरित बिल लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटवर देण्यात येतील आसे मकाई सहकरी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रका द्वारे जाहीर केले आहे . या वेळी अधीक बोलताना दिग्विजय बागल म्हणाले की बऱ्याच दिवसांपासून आपल्या मकाई सहकारी साखर कारखाण्याबाबत चुकीच्या पध्दतीने बातम्या पसरवल्या जात आहेत मात्र हे करत असताना विरोधकांनी वस्तुथी समजून घेतली नाही.आसे देखील बागल यांनी बोलून दाखवले आहे. घेतली नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्याने या वर्षी आपल्या मकाई चे गाळप १.५ लाख टन व डिसलेरी २५ लाख लीटर असे उत्पादन झाले आहे. जे एकंदरीत चांगले उत्पादन मानले जाते परंतु "बी हेवी मोल्यासिस" मुळे रिकव्हरी यावर्षी कमी राहिलेली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून मकाईच्या बिलासंदर्भात सर्वांमध्येच संभ्रमावस्था आहे. मी सांगू इच्छितो की, तोडणी वाहतूक देय (एच एन टी) चे ६.५ कोटी रुपये तसेच एफ आर पी चे १४ कोटी रुपये देणी बाकी आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वर्षी मकाई ने २० जानेवारी पर्यंत ची सर्व शेतकरी व सभासदांचे बिल २२०० रु. प्रमाणे दिली आहेत. तसेच मकाई च्या बिलासंदर्भातील पैश्यांची उपलब्धता ही झालेली आहे, काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर लगेच ८ मार्च पर्यंत ची बिले येत्या काही दिवसात २३२४ रु प्रमाणे शेतकरी व सभासदांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येतील.या वर्षी आपल्या मकाई ला खेळते भांडवल (pledge loan) उपलब्ध झाले नव्हते. म्हणून साखर व स्पिरीट विक्री शिवाय कारखान्याकडे उत्पन्नाचा दुसरा मार्ग नव्हता. लॉकडाऊन च्या काळात साखरेला उठाव नसल्यामुळे वेळेत केन पेमेंट जमा करू शकलो नाही.असे बागल यांनी स्पष्ट केले आहे. मला जाणीव आहे की या कोरोना काळात सर्वांना अडचणी आहेत व त्या दूर करण्यासाठीप पैश्यांची गरज आहे. सर्वांचे बिल शक्य तितक्या लवकर चुकते व्हावे यासाठी मी प्रयत्न करत आहे.असे बागल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मकाई कारखाना हा करमाळा तालुक्याचा चेहरा आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी बांधव, सभासद , कर्मचारी आणि येथील जनतेसोबत नेहमीच उभे आहोत आणि पूढेही असणार.असा विश्वास देखील दिग्विजय बागल यांनी शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांना दिला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts