राष्ट्रवादीचे उपमुख्यंमत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा मतदारसंघाचे आमदार संजयमा शिंदे हे सध्या शेतकऱ्यांच्या नावे उचललेल्या बोगस कर्ज प्रकरणावरून राज्यभर चर्चेत आले आहेत.
आमदार संजयमा शिंदे अध्यक्ष असलेल्या विठ्ठल कार्पोरेशन या साखर कारखान्याच्या वतीने २०१३ साली शेतकऱ्यांना खतं देतो म्हणून उतारे व आधार कार्ड घेऊन काही कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्या होत्या , त्या आधारे पुणे येथील पंजाब नॅशनल बँकेतुन शेतकऱ्यांच्या नावे कोट्यावधी रुपयांचे बोगस कर्ज उचलले होते.या सर्व शेतकऱ्यांना बँकेने वकिला मार्फत नोटीसा पाठवल्याने या धक्कादायक प्रकाराचा भांडाफोड झाला आहे.आमदार संजयमामा शिंदे यांनी हे कर्ज उचलल्याने अनेक शेतकऱ्यांना सिबिल रिपोर्ट मुळे पिक कर्ज मिळणे देखील मुश्किल झाले आहे,कधीही बँकचे तोंड न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पुणे येथील पंजाब नॅशनल बँकेने कर्ज दिलेच कसे आसा सवाल देखील उपस्थित होत आहे. आमदार शिंदे अध्यक्ष असलेल्या या कारखान्या विरोधात अतुल खुपसे यांनी आंदोलन उभा केले असुन या आंदोलनास शेतकऱ्यांतुन पाठिंबा मिळत आहे
आज पुणे येथील पत्रकार परिषदेत अजित पवार यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की "अतुल खुपसे यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलले असल्याचा आरोप केला आहे " या बाबत आपले मत काय? असे विचाराताच अजित पवार म्हणाले की आरोप करणारे करत असतात त्यांच्याकडे काही पुरावे असल्यास द्यावेत मी तपासायला सांगतो असे उत्तर दिले आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला असून, आम्हाला कधीही बँकेत न जाता बँकेच्या नोटीस आल्या असून त्यावर विठ्ठल कार्पोरेशन चे नाव असून लाखो रुपायांचे कर्ज दाखवले आहे,काही शेतकऱ्यांचे कर्ज मागील आठवड्यात कारखान्याने भरले देखील आहे मग आणखी कसले पुरावे अजित पवार यांना हवे आहेत असा सवाल आता शेतकऱ्यांतुन विचारला जात आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.