loader
Breaking News
Breaking News
Foto

विविध उपक्रम राबवून राष्ट्रवादी काँग्रेस चा वर्धापन दिन साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आजा बावीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांकडून नियोजन करण्यात आले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी प्रथम भाजी मंडई मधील लोकांना मिष्टान्न वाटप करण्यात आले.त्यानंतर करमाळा पोलिस ठाण्याला आश्पाक जमादार यांच्या वतीने आधुनिक सॅनिटायझर मशीन सप्रेम भेट देण्यात आले. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल करमाळ्याचे सुपुत्र सोमनाथ लोहार यांचा व करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

कोरोना काळात 250 पेक्षा जास्त कोविड रुग्णांना प्लाझ्मा मिळवून देणारे कोविड योद्धे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गौरव झांझुर्णे यांचा विशेष सत्कार करण्यात आला

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शिवराज जगताप,करमाळा राष्ट्रवादी कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,राष्ट्रवादी पदवीधर तालुकाध्यक्ष रवींद्र वळेकर,सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष ओंकार पलंगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.गोवर्धन चवरे, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सोमनाथ लोहार,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष नलिनी जाधव,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सदस्य महेश काळे पाटील,युवक नेते अशपाक जमादार,सरपंच मानसिंग खंडागळे,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर आंनद कांबळे,विवेकानंद लोहार,अझहर शेख,मुस्तकींन पठाण यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts