loader
Breaking News
Breaking News
Foto

एस.सी/एस टी च्या _पदोन्नतीआरक्षणाची स्थगिती तात्काळ उठवा- अर्जुनराव गाडे

करमाळा तहसील कार्यालय येथे आर पी आय( आ) च्या वतीने अर्जुनराव गाडे यांच्या नेतृत्वाखाली निर्दशने करण्यात आली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे पदोन्नती मध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे.सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय,राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहे, परंतु महाराष्ट्र सरकारने ७ मे २०२१ रोजी जी.आर काढून त्याला स्थगिती दिली ती तात्काळ उठवावी आशी मागणी आर पी आय (आठवले ) चे तालुकाध्यक्ष अर्जुनराव गाडे यांनी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

हा मागासवर्गीय कर्मचारी यांच्या वर अन्याय आहे.सदरचा जी.आर रद्द करुन पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने त्वरित घ्यावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी_ऑफ_इंडिया(आठवले) करमाळा_शहर_व_तालुका यांच्या वतीने निदर्शने करून मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

✍ चौफेर प्रतिनीधी

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष अर्जुनराव गाडे, सुरेश झेंडे जिल्हा उपाध्यक्ष , बाळासाहेब टकले धनगर आघाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र सरतापे ता.सरचटनिस , मच्छिद्र चव्हाण युवक आघाडी तालुकाध्यक्ष ,पोपट कदम तालुका संघटक, सुभाष देडगे, नवनाथ गाडे ,विष्णु चांदणे,शरदराव पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts