मागील काही राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास जगताप गटाच्या गोटात उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे ,जयवंतराव जगताप यांचे बाजार समितीतील सदस्यत्व रद्द करण्याची याचीका फेटाळून जगताप यांना मिळालेला दिलासा असो,किंवा सभापती उपसभापती यांना डावलून आपले कट्टर समर्थक विठ्ठल शिरसागर यांची बाजार समितीच्या सचिव पदी झालेली निवड असो या सर्व घडामोडीत विरोधकांना धोबीपछाड देत जगताप गटाचे नेते जयवंतराव जगताप यांनी मास्टर स्ट्रोक लगावला आहे.
या घडामोडी घडत असतानाच करमाळा नगर पालिकेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी रस्ते व शहराच्या अंतर्गत व मुलभूत विकास कामांसाठी तब्बल "सोळा कोटी ऐकवीस लाख चौतीस हजार" रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून या कामांची प्रत्यक्षात वर्कऑर्डर काढली आसल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी दिली. तसेच "आजपर्यंत झालेल्या एकाही नगराध्यक्षाच्या कालावधीत ऐवढा निधी मंजूर झाला नसल्याचे" सांगताना हा निधी मिळवण्यासाठी "कोणत्याही नेत्यांची अथवा पक्षाची मदत न घेता स्वकर्तृत्वावर" हा निधी मिळवला असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 'हा' विकास कामे करु शकणार नाही, आसे विरोधक बोलत होते पंरतु आज 'क ' वर्गातील नगरपालिका असताना सुद्धा जिल्ह्यात सर्वाधिक निधी खेचून आणुन प्रत्यक्ष कृतीतून विरोधकांना उत्तर दिले असल्याचे नगराध्यक्ष जगताप यांनी सांगीतले.
या वेळी करमाळा शहराचा विकासकामाबत नगराध्यक्ष म्हणून भरीव कार्य करुन आपण वेगळा ठसा उमटवला आहे भविष्यात तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी विधान सभा लढवणार का?असा थेट प्रश्न चौफेर च्या प्रतिनधिनी विचाराला असता नगराध्यक्ष वैभवराजे जगताप म्हाणाले की करमाळा शहरातील जनतेने जगताप गटावर विश्वास टाकून जगताप कुटुंबातील सदस्याला नगराध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी आपण आजपर्यंत सार्थ ठरविण्यासाठी दिवसरात्र एक केलेले आहे, हे संपूर्ण जनतेने पाहिलेले आहे. "जनता हाच माझा पक्ष असल्याने जनता सांगेल तसेच आपण काम करत राहणार आहे". माझे काम हीच माझी ओळख आहे, जगताप गटात वारसा हक्काने नेता लादण्याची प्रथा नाही त्या मुळे जनतेने ठरवले व इच्छा व्यक्त केली तर पुर्णताकदीनुसार विधानसभा निवडणूकच्या रिंगणात उतरेल असा असा आत्मविश्वास नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी बोलून दाखवला .जगताप यांच्या या सुचक वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात नक्कीच उमटतील अशी चर्चा आता सुरु आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.