loader
Breaking News
Breaking News
Foto

करमाळा शहर होणार खड्डे व धुळ मुक्त, रस्त्यांच्या कामासाठी तब्बल १६कोटी २१ लाख रु मंजूर! नगराध्यक्ष वैभराजे जगताप यांची माहीती

करमाळा शहरातील रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण कामासाठी विविध योजना अनुदानातून  १६ कोटी  २१ लाख ३४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून शहरातील एकही रस्ता अगर गल्लीबोळ यातून वंचित राहणार नसुन करमाळा शहर खड्डे व धुळमुक्त शहर करु आशी माहीती नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत बोलताना दिली. 

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

 यावेळी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, बाळासाहेब बलदोटा, बाळासाहेब कांबळे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना नगराध्यक्ष वैभवराजे जगताप म्हणाले की, शहरातील जनतेने जगताप गटावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण आजपर्यंत विविध कामे शहरात राबविली असून त्याचेच द्योतक म्हणजे 'स्वच्छ भारत अभियानात' 'क'वर्ग असलेली करमाळा नगर परिषदेने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आला आहे अर्थात याचे श्रेय जनतेने दिलेल्या सहकार्यास जाते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे नगराध्यक्ष यांनी सांगीतले

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

शहरातील डांबरीकरण व काँक्रिटीकरणबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदानातून  2,54,02389/- तर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत 3,79,36,972/- तर रस्ता अनुदान योजना अंतर्गत  41,27,132 /-तर नागरी दलित्तेतर वस्ती सुधारणा योजना अंतर्गत  72,31,251 /- आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत  2,29,96,165/-  असा मिळून  9 कोटी  76 लाख  93 हजार  909  रूपयांचा निधी आपण स्वतः विविध खात्यांचा पाठपुरावा करून निधी उपलब्ध केलेला आहे. यामध्यामातून ज्या त्या कामांच्या वर्कऑर्डरही काढण्यात आल्या असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. वास्तविक हे कामे लवकरच सुरू होणार होते परंतु काही तांत्रिक अडचणी असल्याने आता सदरची कामे लवकरच पूर्ण करून घेवून शहरातील जनतेला होत असलेला त्रास दुर करणार आहोत. तसेच 06 कोटी  44 लाख  40 हजार  146  रूपयांची प्रास्तावित कामे असून त्याचीही लवकरच मंजूरी मिळेल, यामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत  3,75,15,549 /- व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत  2,69,24,597  असा निधी उपलब्ध होणार असल्याने एकूण  16 कोटी  21 लाख  34 हजार  55  रूपयांचा निधी शहरातील डांबरीकरण व काँक्रिटीकरण कामासाठी नगराध्यक्ष या नात्याने आपण स्वतः पाठपुरावा करून खेचून आणला असल्याची माहीती नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी पत्रकारांना दिली व ते म्हणाले करमाळा शहरातील एकही रस्ता अगर गल्लीबोळ आम्ही डांबरीकरण, काँक्रिटीकरण, पेव्हींग ब्लॉक यापासून वंचित ठेवणार नाही. असे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी बाळासाहेब बलदोटा यांच्यासह कार्यकर्त्ये उपस्थितीत होते

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts