loader
Breaking News
Breaking News
Foto

सतिश बापु निळ यांनी दिलेल्या मानसिक आधारा मुळे आमची आज्जी भिवरानानीचा जिव वाचला-✍️ मकरंद शेंडगे

करमाळा तालुक्यातील निमगाव (ह) येथील ८० वर्षे वय असलेली ज्येष्ठ महिला श्रीमती भिवराबाई ( नानी) जगताप यांनी ईर्षेने कोरोना रोगांवर मात केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आमच्या गावाचे सामाजिक कार्यकर्त्ये व गोरगरीबांचे कैवारी सतिश बापु निळ यांनी घरी येऊन आमच्या आज्जी ला व आमच्या परिवाराला जो धिर व आधार दिला त्यामुळेच आमची आज्जी भिवरानानी यांचा जिव वाचला आशी भावना नातु मकरंद शेंडगे यांनी सोशेल मिडियावर पोस्ट करुन व्यक्त केल्या आहेत

✍ चौफेर प्रतिनीधी

तालुक्यातील निमगाव (ह) येथील ज्येष्ठ महिला श्रीमती भिवराबाई जगताप यांना कोरोना साथीचा आजार झाला होता. त्यांना अगोदरच दमा, शुगर चा त्रास आहे.त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, डोके, हात पाय दुखत होते, अंगाचा गळाटा झाला होता. अन्न पाणी वर्ज झाले होते. जवळचे नातेवाईक व गावातील लोक कोणीही भेटण्यास जात येत नव्हते. प्रकृती गंभीर व खालावत चालली होती. आज उद्या वर आली की काय असे वाटू लागले होते. तीला करमाळा येथील कुटीर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल करण्यास मी प्रयत्न करत होतो, पण बेड शिल्लक राहिले नाहीत,नगरपालिका दवाखान्यात घेऊन जा. असे सांगितले जात होते. कोणीही दाखल घेतली नाही.म्हणून न विलाजाने घरीच गोळ्या औषधे देऊन तिच्यावर उपचार सुरू केले. परंतु काहीच फरक पडत नाही. काहीच उपयोग होत नाही असे आम्हाला माहीत असूनही मी तिला धीर देत होतो. याच दरम्यान आमचे गावातील गोरगरीब जनतेसाठी सतत काही ना काही मदत करणारे, सर्वांची काळजी घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे सतीश बापू नीळ यांना भिवरा नानीच्या आजारपणाची बातमी समजली व तात्काळ बापू आमच्या घरी आले त्यांनी नानीच्या तब्बेतीची विचारपूस केली, प्रकृती खालावत गेली आहे, उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले व युवा नेते दिग्विजय भैय्या बागल व संतोष भैय्या वारे यांना कोविड सेंटर मध्ये बेड उपलब्ध करून देण्यास विनंती केली त्यावरून दोन्हीही ठिकाणी बेड उपलब्ध आहेत पेशंट घेऊन या म्हणून सांगितले. त्यांनी लगेचच आरोग्य विभाग यांना फोन करून कोरोना पेशंटला मांगी किंवा पोथरे येथील कोवीड सेंटर येथे घेऊन जायचे आहे. आपली सरकारी गाडी पाहिजे आहे असे सांगितले व त्यांनी गाडी पाठवून देण्यास तयारी सुरू केली. पण आमची भिवरा नानी दवाखान्यात जाण्यास तयार होत नव्हती. मी मरेन मला खूप भीती वाटते आहे, माझे काही खरं नाही असे म्हणून दवाखान्यात जाण्यास नकार देत होती. मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सतीश बापू नीळ पुन्हा एकदा आमचे घरी आले व म्हणाले अग ये माझ्या म्हातारे, तु माझ्या पार्टीचा, माझ्या कुटुंबाचा एक झेंडा आहे. तुला नीट करावं लागते आहे. तुझी आम्हाला गरज आहे. तुझा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम पाहिजे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

तुला दवाखान्यात घेऊन जाण्यास दिग्विजय भैय्या बागल यांनी तुझ्या साठी गाडी पाठविली आहे, लवकर उठून तयार हो, तुला मी मांगी येथे दवाखान्यात घेऊन जाणार आहे. असे म्हणताच भिवरा नानी गया वया करून रडू लागली व म्हणू लागली की बापू मला दवाखान्यात घेऊन जाऊ नको, मी हितचं राहून बरे होते, माझी काही काळजी करू नको. मी तुझ्या पार्टीचा झेंडा आहे हे तुझ्या तोंडून शब्द ऐकले आहेत. मी तुला सोडून जाणार नाही. असे म्हणून पुन्हा रडू लागली. मग मी व सतीश बापूंनी तिला धीर देत, तुला कुठेही घेऊन जात नाही, पण घरी तरी जेवण करून गोळ्या औषधे घेऊन लवकर बरे हो म्हणून सांगितले. त्याप्रमाणे दररोज सकाळी लवकर उठून मनाची खंबीर तयारी करून नित्य नियमाने गोळ्या औषधे घेऊन वेळे वर जे काही असेल ते खाणे पिणे चालू केले.व आमची भिवरा (नानी) फक्त बरी नव्हे तर एकदम ठणठणीत झाली आहे. सतीश बापू नीळ यांनी फक्त एकच गोष्ट केली होती ती म्हणजे विश्वास, प्रेम, आपुलकी व जिव्हाळा दिला होता तो म्हणजे तू माझा झेंडा आहे. याच एकमेव ईर्षेने आज माझी लाडकी आज्जी ठणठणीत झाली आहे. ✍️ मकरंद शेंडगे मु. निमगाव (ह)ता. करमाळा

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts