loader
Breaking News
Breaking News
Foto

सुशील कुमारला तुरुंगात धोका असलेल्या गँगस्टर सोबत काय झालं, जाणून घ्या

सुशील कुमारला तुरुंगामध्ये असताना एका गँगस्टरपासून धोका आहे, असे म्हटले जात होते. त्यामुळे सुशील कुमारची झोपही उडाली होती. पण तुरुंगातील या गँगस्टरबरोबर आता काय करण्यात आले आहे, ही गोष्ट आता समोर आलेली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तुरुंगात लॉरेन्स बिश्नोई हा आपल्यावर हल्ला करू शकतो आणि आपल्या जीवाला धोका आहे, असे सुशील कुमारने यापूर्वी सांगितले होते. त्यामुळेच सुशील कुमारने तुरुंगातील जेवणही सोडले होते. सुशील कुमार यावेळी चांगलाच घाबरलेला पाहायला मिळाला होता. पण आता तुरुंगातील लॉरेन्स बिश्नोईबाबत एक बातमी पुढे आली आहे. सुशील कुमारला मंडोली येथील तुरुंगात ठेवले होते आणि तिथेच लॉरेन्स बिश्नोईला ठेवण्यात आले होते. पण सुशील कुमारला त्याच्यापासून धोका आहे, हे समजले होते. त्यामुळे आता लॉरेन्स बिश्नोईला तिहार तुरुंगातील पहिल्या क्रमांकाच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे. या पहिल्या कोठडीत सर्वाधिक सुरक्षा दिली जाते.

वैभव फरतडे ✍ (मुंबई प्रतिनीधी)

या प्रकरणात आता एक नवीन नाव समोर आलं आहे. संपत नवीन, असे या व्यक्तीचे नाव आहे. संपतकडूनही सुशील कुमारला धोका असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे संपतला आता तिहार तुरुंगात हलवण्यात आले आहे. त्यामुळे सुशील कुमारसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी सुशील कुमारला तुरुंगात जास्त धोका नसल्याचे समोर आले आहे. सुशील कुमारचे प्रकरण हे फक्त एका माहिन्याच्या घराच्या भाड्यासाठी झाले नसल्याचे आता समोर येत आहे. सुशील कुमार हा काला जठेडी या गँगस्टरबरोबर विवादीत प्रॉपर्टीचे काम करत होता. दिल्लीत एक मोठं घर विवादीत प्रॉपर्टीमध्ये होते. सुशील कुमार आणि काला जठेडी यांनी या विवादीत प्रॉपर्टीमध्ये काम करत होते. ही विवादीत प्रॉपर्टी सुशील कुमारच्या पत्नीच्या नावावर करण्यात आली होती आणि त्यानंतर यामधील काही पैशांचा हिस्सा सुशील कुमारला काला जठेडीला द्यायला होता. पण सुशील कुमार हे पैसे काला जठेडीला देत नव्हता. त्यामुळे या घरावर कब्जा करण्यासाठी काला जठेडीने सागरचा वापर केला

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

काला जठेडीचा भाचा सोनू महालहादेखील सागरबरोबर सुशील कुमारच्या घरात राहत होता. सागरच्या रुपात काला जठेडी हा या घरावर कब्जा करत होता आणि सुशील कुमारला ते नको होते. सुशील कुमारने यावेळी सागरला मारहाण करायचे ठरवले होते, कारण तो त्याच्या घरावर कब्जा करत होता. त्याचबरोबर आपल्याबरोबर यापुढे कोणी पंगा घेऊ नये, यासाठी सुशील कुमारने सागरला मारहाण करण्याचा व्हिडीओ आपला मित्र प्रिन्सला काढण्यासाठी सांगितला होता. पण या मारहाणीत सागरचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण सुशील कुमारच्या अंगाशी आले. त्यामुळे सुशील कुमारला सध्याच्या घडीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts