अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे. तसंच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळं राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा या सतत शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर टिका करत आसतात.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिग्गज नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या निवडणुकीला रिट याचिकेद्वारे आव्हान दिले होते. नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘मोची’ असल्याचे दाखवून मुंबई उपनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून अनुसूचित जातीचा दाखला मिळवला आणि मुंबई उपनगर जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता समितीने ३ नोव्हेंबर २०१७ रोजी ते प्रमाणपत्र वैध ठरवले, असा आरोप अडसूळ यांनी केला होता. खंडपीठाने अंतिम सुनावणीअंती ९ एप्रिल २०२१ रोजी निर्णय राखून ठेवला होता.
या प्रकरणी आज पुढील सुनावणी झाली. तेव्हा न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठानं अडसूळ यांची याचिका मान्य केली आणि समितीचा ३ नोव्हेंबर २०१७ रोजीचा निर्णय रद्दबातल केला. दंडाची दोन लाख रुपयांची रक्कम दोन आठवड्यांत महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करण्याचा आदेशही खंडपीठानं दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राणा यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे. तसंच, जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र सहा आठवड्यांच्या आत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे परत करण्याचा आदेशही खंडपीठाने नवनीत राणा यांना दिला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.