विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी दक्षिणेतील राज्यात वाॅटर बेल हा उपक्रम राबविला जातो त्याच धर्तीवर आपल्या राज्यात देखील पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमधे हा उपक्रम राबविण्यात येत आहे याचे कारणच असे आहे की फास्टफूड च्या जमान्यात विद्यार्थी स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत
योग्य वेळी सकस आहार घेत नाहीत त्याचबरोबर दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी शरीरासाठी आवश्यक असल्याने तेवढ्या प्रमाणात पाणी विद्यार्थी पित नाहीत हे सर्वेक्षणातून निदर्शनास आले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असल्याने शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोज दराडे विद्यार्थी व पालकांना पाण्याचे महत्व पटवून दिले .
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी निमगाव येथील जि प प्रा शाळा निळ वस्ती येथे राबवला हा आनोखा आदर्शवत उपक्रम .
"पाणी हाच आरोग्यासाठी उत्तम उपाय असल्याने जि प प्रा शाळा नीळवस्ती येथे वाॅटर बेल ही विशेषतः तीन वेळा वाजवली जाते व विद्यार्थी जेवणाबरोबरच वाॅटर बेल झाल्यावर भरपूर पाणी पितात आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात .भरपुर पाणी पिल्याने विद्यार्थ्यांची पचन शक्ती वाढते. त्यामुळे आजारी, पडणे अशक्त पणा या पासुन मुक्ती मिळते व मुले शारिरीक व मानसिक दृष्ट्या संतुलीत रहातात" उपक्रमशील शिक्षक श्री तात्यासाहेब जाधव.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.