loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान च्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे व जयकुमार कांबळे यांना कोविड योद्धा पुरस्कार प्रदान

- प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान रावगाव च्या वतीने आज कोविड योद्ध्यांचा यथोचित भव्य सत्कार करण्यात आला सदरचा कार्यक्रम शासकीय विश्राम गृह येथे पार पडला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष वारे तसेच जनतेचे नगरसेवक जय कुमार कांबळे या दोघांना "कोविड योद्धा" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महात्मा फुले समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंजाडे हे उपस्थित होते .झिंजाडे हे बोलताना पुढे म्हणाले ,की सदर प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान चा कार्यक्रम हा आगळावेगळा अनुकरणीय असून कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

प्रतिष्ठानने असेच समाजोपयोगी कार्य करावे भविष्यात त्यांना आमचे पूर्ण सहकार्य राहील .रक्तदान शिबिर ,मोतीबिंदू शिबिर ,वृक्षारोपण लागवड , कार्यक्रम असे विविध कार्यक्रम संस्थेने राबविलेले आहे त्यांचे सदरचे कार्य हे अनुकरणीय आहे असे ते बोलताना म्हणाले . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वारे म्हणाले की मला मिळालेला सन्मान हा अविस्मरणीय आहे संस्थेचे कार्य हे खूप उत्कृष्ट आहे संस्थेने मला कोविड योद्धा म्हणून सन्मानित केले अशा शब्दात त्यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव ,प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे ,प्रवीण कांबळे ,शहराध्यक्ष ओमकार पलंगे ,राजू पवार , सागर ओहोळ, गणेश पवार, आदीसह मान्यवर उपस्थित होते तर आभार संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी मानले .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts