बिड,अहमदनगर, नंतर करमाळा तालुक्यात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बिबट्याने दहशत माजवली होती तालुक्यात तिन तर दोन जिल्ह्यात मिळुन बिबट्याने नऊ बळी घेतले होते ,अखेर १८ डिसेंबर रोजी वनविभाग व खासगी शार्प शुटर ने वांगी शिवारात राखुंडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याचा खात्मा केला होता ,धवलसिंह मोहिते पाटील यांच्या अचुक गोळीने बिबट्या ठार केल्यावर नागरींकानी सुटकेचा निश्वास सोडला होता.
गेल्या वर्षी कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर बिबट्याने धुमाकुळ घातला होता, बिबट्यांची संख्या नेमकी किती आहे यावरुन देखील रोज अफवा येत होत्या ,एके दिवशी चक्क गाभण असलेल्या मोठ्या कुत्रीलाच बिबट्या समजून लोकांनी धुम ठोकली होती मात्र वनविभाग पोहचल्यानंतर बिबट्या नसुन कुत्री असल्याचे सिद्ध झाले होते.आत्ता पुन्हा एकदा कोरोना कमी होवुन जनजीवन पुर्व पदावर येत आसतानाच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांसह प्रशासन देखील खडबडून जागे झाले आहे ,मात्र पाहिलेला प्राणी बिबट्याच होता हे आत्ताच ठाम पणे सांगता येणार नाही.
पुन्हा एकदा जवळपास सहा महिन्यानी पुन्हा एकदा बोरगाव परिसरात एका व्यक्तीला बिबट्या दिसला असुन त्यांनी तात्काळ वनविभाग यांना संपर्क केला आहे ,संबंधित ठिकाणी जावुन ठशांचे पंचनामे झाल्यानंतरच तो बिबट्या आहे का ,तरस आहे की अन्य कोणता प्राणी आहे ते समजणार आहे ,मात्र नागरीकांनी अफवा न पसरवता सावधानीपूर्वक राहवे असे आवाहन तहसीलदार समिर माने यांनी नागरीकांना केले आहे .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.