loader
Breaking News
Breaking News
Foto

मुघली पातशाहीच्या अंधारात बुडालेल्या जनतेला शिवरायांनी" स्वराज्याचा सुर्य दाखवला," स्वराज्याचे "सुराज्य "करणे हिच आपली जबाबदारी- गणेश चिवटे

मुघल पातशाहीच्या अंधारात बुडालेल्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा सुर्य दाखवला आज त्या स्वराज्याचे सुराज्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना पार पाडायची आसे आवहान भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी तमाम शिवभक्त युवकांना केले आहे. शिवराज्याभिषेक दिन भाजपा तालुका संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला त्या वेळी चिवटे बोलत होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी अधिक बोलताना चिवटे व म्हणाले की शिवरायांनी संपुर्ण आयुष्यात सर्वस्वी रयतेचा विचार केला , शक्ती युक्ती च्या जोरावर चार पातशाह्या बुडवुन हिंदवी स्वराज्य उभा केले व आजच्या दिवशी रायगडावरती 32 मण सोन्याच्या सिंहासनावर राज्याभिषेक झाला आज त्यांचा सोहळा करण्याचे भाग्य आपल्याला लाभत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट असुन छत्रपती शिवाजीमहाराजांनी निर्माण केलेल्या या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपण काम केले पाहिजे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळी उपस्थित मान्यवरांकडून छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व शिवरायांचा जय-जयकार करण्यात आला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकण ,संजय अाण्णा घोरपडे, मिरगव्हाण चे सरपंच मच्छिंद्र हाके ,प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील ,पांडे ग्रामपंचायत सदस्य नितीन निकम, नेचर डिलाईट चे संकलन अधिकारी प्रसाद गेंड, युवा मोर्चा उपाध्यक्ष मनोज मुसळे, दीपक भोसले ,गणेश साखरे ,महादेव गोसावी, अक्षय शहा आदीजण उपस्थित होते,

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts