loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवराज्याभिषेक" दिनाचे औचित्य ,भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तालुक्यात "वृक्षारोपण"

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तालुक्यातील अनेक गावात देशी वाणाची पारंपारिक पाचशे झाडे लावून वृक्षारोपण केले या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या दीड वर्षापासून जग कोरोना महामारीशी लढत आहे. निसर्गातील ऑक्सिजन दवाखान्यात विकत घेण्याची वेळ लोकांवर आली आहे. अशा परिस्थितीत वृक्षारोपण ही लोक चळवळ व्हावी यासाठी तालुक्यात भालेवाडी, पांडे, वडगाव, पिंपळवाडी, भोसे व पोथरे या गावांमध्ये वृक्षारोपण करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याप्रसंगी गावा गावातील ग्रामस्थ व तरुणांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला सध्या पावसाचे दिवस असल्याने वृक्षारोपणासाठी हीच योग्य वेळ असल्याचे ही ग्रामस्थ सांगत होते. स्थानिक युवक पदाधिकारी यांची वृक्षारोपण साठी खड्डे घेणे रोपे लावणे पाणी घालने यासाठी प्रचंड उत्सुकता होती.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

सदर कार्यक्रम तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने युवा मोर्चाचे दीपक चव्हाण, अमोल पवार यांनी यशस्वीपणे पार पाडला यावेळी भालेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपचे संघटन सरचिटणीस शशिकांत पवार अशोक फुके आबा तरंगे नितीन तरंगे बाळासाहेब तरंगे विलास पवार महेंद्र डोलारे संतोष कांबळे पांडे येथे गोरख अनारसे भीमराव शिरसागर प्रल्हाद मेहेर वडगाव येथे सुनील मुसळे विकास गायकवाड भोसे येथे सरपंच दीपक सुरवसे वालचंद रोडगे रोशेवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील चव्हाण ऋषिकेश चव्हाण पोथरे येथे पोलीस पाटील संदीप पाटील उपसरपंच अंकुश शिंदे अंगद देवकते हरीभाऊ हिरडे राज झिंजाडे आदी उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संतोष कांबळे सचिन दुधे कृष्णा मुसळे अंगद भांडवलकर स्वप्नील चव्हाण दिलीप शिरगिरे विशाल अडसूळ यांनी परिश्रम घेतले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts