loader
Breaking News
Breaking News
Foto

अंजली श्रीवास्तव यांना कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान चा पुरस्कार जाहीर

सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानने विविध साहित्य प्रकारासाठी दरवर्षी प्रमाणे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्या होत्या.बालसाहित्य,कथा, कादंबरी, समीक्षा, ललित लेख संग्रह,इ.अनेक साहित्य प्रकारात स्पर्धा घेतल्या होत्या. यापैकी बालसाहित्य प्रकारात अंजली श्रीवास्तव यांच्या "आकाशाचा चित्रकार" या बालकाव्य संग्रहास उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र संस्थेच्या सचिव मा.सावित्री जगदाळे यांनी कळवले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सदर पुस्तकात छोट्या मुलांसाठी बडबडगीतातून संस्कार ही बिंबविण्याचे काम अंजली श्रीवास्तव यांनी केले आहे. मा.किरण केंद्रे (संपादक,किशोर, बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे.) यांचे शुभेच्छा पत्र सदर पुस्तकास लाभले आहे.सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान चा उत्कृष्टसाहित्य निर्मिती गौरव पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातला मानाचा पुरस्कार समजला जातो. रोख रक्कम, प्रमाणपत्र,शाल, व गौरवचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

मा.मुख्याधिकारी (करमाळा न.प.)वीणा पवार मॅडम, मा.सुनिता देवी,मा.आसादे मैडम,मा.धनश्री दळवीमॅडम मा.राजश्री कांबळे मॅडम, मा.ज्योती पांढरे मॅडम मा.जयश्री वीर मॅडम,मा.शीतल करे पाटील, मा.पुष्पा लुंकड, मा.दीपा मंडलेचा,मा.रेशमा जाधव,अंगणवाडी च्या सर्व शिक्षिका,तसेच सर्व पत्रकार बंधुं व लिहिणार्या आम्ही ,कविता जगतांना, आम्ही विश्व लेखिका, काव्य प्रेमी शिक्षक मंच तसेच करमाळा गृप मधील सर्व महिला , महिला डॉक्टर्स ,साहित्य मंचातील सर्व साहित्यकारांनी महिलांनी साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांचे अभिनंदन केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

साहित्य क्षेत्रातील विविध पुरस्कार श्रीवास्तव यांना मिळाले आहेत

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts