loader
Breaking News
Breaking News
Foto

खासगी कोविड लसीकरण साठी करमाळा तालुक्यातील "या दवाखान्यांना" मिळाली परवानगी. या आहेत अटी शर्ती

, खाजगी कोविड-१९ लसीकरण केंद्रासाठी प्रस्ताव वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मागणी केले होते. त्यानुसार वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रस्तावाची छाननी करून मंजुरी साठी प्रस्ताव या कार्यालयास सादर केले होते. त्यानुसार जिल्हास्तरावर मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षेखाली पार पडलेल्या कोविड-१९ लसीकरण जिल्हा कार्यबल गट समिती सभेमध्ये खालील नमूद अटी व शर्ती च्या अधीन राहून तक्त्यात नमूद केल्यानुसार खाजगी कोविड लसीकरण(PCVC) केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यात करमाळा तालुक्यातील कुर्डे हाॅस्पिटल केम,राजेश्वर हॉस्पिटल राजुरी ,दुरंदे हॉस्पिटल कोर्टी या दवाखान्यांना परवानगी मिळाली असल्याने तालुक्यातील सरकारी यंत्रणेवर ताण कमी होवुन लसीकरण वेगवान होण्यास मदत होणार आहे

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

कोविड लसीकरण करणाऱ्या दवाखान्यांना खालील अटी शर्ती विनय दिले आहेत .मान्यता दिलेल्या खाजगी कोविड लसीकरण(PCVC) केंद्रांनी उत्पादकाकडून लस खरेदी करून लसीकरण केंद्र सुरु करावे. अटी व शर्ती:- १. आपण खरेदी केलेली लसीची नोंद कोविन पोर्टलवर करूनच लाभार्थ्यांचे लसीकरण करणे बंधनकारक राहील. २. लस दिलेल्या सर्व लाभार्थ्यांच्या नोंदी कोविन पोर्टल वर करून लाभार्थ्यास लसीकरणाचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक राहील.तरी शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करून लसीकरण सत्र राबवणे बंधनकारक राहील. ३. कोविड प्रोटोकॉल चे पालन लसीकरण सत्राच्या ठिकाणी होईल याची दक्षता घ्यावी अन्यथा आपली मान्यता रद्द करण्यात येईल. ४. आपणास कोविन पोर्टल वापराचे प्रशिक्षण व User Credentials जिल्हा लसीकरण अधिकारी यांच्याकडून उपलब्ध करून दिले जातील. ५. लसीकरण सत्राच्या ठिकाणी AEFI KIt/Anaphylaxis kit असणे बंधनकारक राहील. ६. लस शितसाखळी अबाधित ठेवण्यासाठी लागणारी आवश्यक उपकरणे खाजगी Cvc कडे उपलब्ध असणे बंधनकारक राहील व शितसाखळी उपकरणाच्या दैनंदिन तापमानाच्या नोंदी ठेवणे बंधनकारक राहील. ७. सर्व AEFI च्या नोंदी कोविन पोर्टल वर करणे बंधनकारक राहील. ८. शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या दर पत्रकानुसार प्रति डोस शुल्क आकारणे बंधनकारक राहील

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts