कोळगाव तालुका करमाळा येथील जालिंदर यादव भाग्यवंत यांचे नुकतेच निधन झाले आहे ,भाग्यवंत हे निवृत्त शिक्षक होते मृत्युसमयी ते ऐंशी वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन सुना,व नातवांडे असा परिवार आहे. भाग्यवंत यांचे एक चिरंजीव राजेंद्र भाग्यवंत हे देखील शिक्षक असून वडिलांच्या निधनानंतर त्यांनी सोशेल मिडियावर एक पोस्ट लिहून वडिलांच्या कार्याचा आढावा व कोरोनाच्या भयावह परिस्थितीत आलेले अनुभव शेयर केले आहेत. राजेंद्र भाग्यवंत यांची पोस्ट चौफेर च्या वाचकांसाठी आहे तसी प्रसारित करत आहोत .
असे अर्ध्यावर सोडून जाताल असे वाटले नव्हते. तुम्ही तरी काय करणार ? नियती पुढे कुणाचे काय चालते ? करोनाची मला लागन झाली आणि मी मृत्युशी झुंज देऊन घरी आलो, तर गावाकडे तुम्ही, आई आणि बंधु करोनाच्या विळख्यात सापडले. आपण फक्त दवाखान्यात एक दिवस काढलात आणि आपला जीवनप्रवास थांबवलात. तसं पाहिले तर, तुम्ही आता ८० व्या वर्षांत प्रवेश केला होता. परंतु तुम्ही ६० च्याच वयाचे वाटत होतात कारण तुमचा आहार आणि व्यायाम. आयुष्यात अनेक चढउतार करत आपण वयाच्या ४२ व्या वर्षी यशवंत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून लागलात, निमगाव गांगर्डा, चिखली, भांबोरा व दिघोळ येथे १७ वर्षाची सेवा करून निवृत्त झालात. संस्थेत सर्व सहकार्यांना आपली परिस्थतीची जाणीव होती. आपला स्वभाव शांत व मितभाषी होता.
लहानपणापासून आपण मला परस्थितीची जाणीव करून देत होतात. आपण म्हणायचे, ' मी निवृत्त व्हायच्या आत तू नोकरीला लागला पाहिजे, तरच योग्य घडी बसेल. त्याप्रमाणे आपण १९९९ ला निवृत्त झाले आणि मी २००० साली लागलो. कमी सेवा झाल्याने त्यावेळेस आपणास फक्त २१०० रु पेन्शन बसली. परंतु मी नोकरीला लागल्याने तुम्हाला कितीतरी समाधान लाभले होते. पुढे माझे लग्न होऊन सुनबाई आली आणि तिच्या नोकरीने आपला आनंद गगनात मावेनासा झाला. आपण नातवांवर अपार प्रेम केले. समृद्धीवर आपले विशेष प्रेम होते. अप्पा आपण जेव्हा 75 व्या वयात प्रवेश केला, त्यावेळेस आपला अमृत महोत्सव करावयाचे ठरवले. त्यावेळेस करमाळा सारख्या ठिकाणी एका मंगल कार्यालयात साजरा केला. त्यावेळेस तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार, प्राचार्य, गट शिक्षणाधिकारी , कवी तुकाराम धांडे, गावकरी, मित्र परिवार, नातेवाईक, पत्रकार इ. उपस्थित होते. तो क्षण, सोहळा कायम आठवणीत राहिल असा झाला. नियती आपणास एवढया लवकर घेऊन जाईल असे वाटले नव्हते. आपणास अनेक गोष्टी पहावयाच्या होत्या, परंतु त्या संचितात नसाव्यात. तसे आपण निवृत्तीनंतर खूप मजेत काळ घालवला. शेतात, गावात, अध्यात्मात वेळ घालवला. आपले लिखानात आणि शेतात दिवसभर मन रमत असे. गावात आणल्याला एक वेगळाच मान होता. सारा गाव लहान्यापासून मोठया पर्यंत अप्पा नावानेच हाक मारीत. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला गावकरी आपल्याला विशेष मान देत. यातच सर्वकाही आले. अप्पा तसे पाहिले तर आपण खूप चांगले जीवन जगलात. आपले काहीच हाल झाले नाहीत. जन्माला येणारा प्रत्येक जीव एक ना एक दिवस जाणारच, हे ठरलेले आहे. शेवटी काळाने कुटुंबाची शेवटची भेट होऊ दिली नाही. त्याला एकमेव कारण करोना.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.