loader
Breaking News
Breaking News
Foto

सुधीर बाभळे गुरुजींचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार, पाच हजार रोपांचे वाटप करण्याचा केला संकल्प!

"उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल क्षितिजापलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी या ओळी बाभळे सरांकडे पाहून आठवतात. असे गौरवोद्गार सुधीर बाभळे गुरुजींच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना त्यांच्या सहकाऱ्यांनी काढले आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कार्यक्रमासाठी करमाळा शहरातील प्रसिद्ध व्यापारी प्रकाश मुनोत,आदर्श शिक्षक बाळासाहेब घाडगे संजय चोपडे सर ,सुदर्शन केकान सर,इसाक इनामदार सर,विजय पेठकर,सुनील वायकर,वर्धमान पेठकर,यासीन सय्यद उपस्थित होते.बाभळे सरांनि व्यक्त केलेल्या मनोगतात प्रत्येक कोविड हाॕस्पिटल मध्ये पिंपळ,वड,कडुलिंबाची स्वतः तयारी केलेली रोपे लावणार तसेच दरवर्षी 5000 रोपांचे मोफत वाटप करणार असा संकल्प व्यक्त केला. रोजी श्री सुधीर काशिनाथ बाभळे मुख्याध्यापक शाळा पोंधवडी ता. करमाळा हे सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त त्यांचा घरगुती कार्यक्रम घेऊन सत्कार करण्यात आला.त्यानिमित्ताने त्यांचे शाळेतील सहकारी इनामदार सर,चोपडे सर,केकानसर यांनी आपले विचार केले. "कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते पण संपलेल्या वाटेसोबतच जन्मणारी नवीन पहाट असते " जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणी व समस्यांवर अत्यंत शांत व संयमाने मात करणारे जि.प.प्रा. शाळा पोंधवडीचे आदर्श मुख्याध्यापक 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31मे 2021 रोजी सेवानिवृत्त झाले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

"सुरज हूँ जिंदगी की रमक छोड जाऊंगा मैं डूबभी गया तो शफक छोड जाऊंगा." या पंक्तीप्रमाणे बाभळे गुरुजींनी आतापर्यंत सेवा केली. प्रामाणिकपणे ,सचोटीने प्रत्येक विद्यार्थी घडविला. एक सहकारी म्हणून अत्यंत शांततेने प्रत्येकाला समजावून घेतले .त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही नवीन शिकण्यास मिळाले .शाळेमध्ये काम करत असताना कितीही बिकट प्रसंग आला तर अत्यंत संयमाने त्या प्रसंगातून सर्वांना सहीसलामत बाहेर काढत. सर्व संकटे शांतपणे स्वतःवर घेऊन शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.प्रत्येक गोष्टीचे अत्यंत खोलवर ज्ञान बाभळे गुरुजींना आहे. मुख्याध्यापक असूनही परिपाठाला,वर्गात नाचून,गाऊन विद्यार्थ्यांना शिकवताना पाहून मन थक्क होते.त्यांच्याकडे पाहून वाटतच नाही की गुरुजी रिटायर झालेत.शाळेतील शिक्षकांपैकी कोणाची काही अडचण असेल'कोणी आजारी असेल तर स्वतःहून एक कुटुंबप्रमुख य नात्याने आस्थेने चौकशी करत,जमेल तेवढी मदत करत. विज्ञान प्रदर्शन असो की शैक्षणिक साहित्य निर्मिती असो प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थ्यांबरोबर स्वतःही सहभागी होऊन यशस्वी झाले. हस्तकला,रांगोळी ,टाकाऊपासूनटिकाऊ वस्तू तयार करणे,सांस्कृतिक कार्यक्रम बसविणे,वृक्षारोपण कार्यक्रमातंर्गत दरवर्षी 5000 रोपे तयार करुन मोफत वाटप करणे असे हजारो उपक्रम बाभळे गुरुजींनी राबविले आहेत या कष्टाचे फळ म्हणून त्यांना पंचायत समिती च्या वतीन दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,पंजाबराव देशमुख जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,दिंगबरराव बागल प्रतिष्ठानचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,अल्पसंख्याक संघटनेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला.त्यांचे कार्य खरेच उल्लेखनीय आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी बाभळे दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts