loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रवाशांसाठी 'लालपरी' पुन्हा धावणार -आगार प्रमुख अश्विनी किरगत

महिनाभरानंतर आता परिवहन महामंडळाची लालपरी आजपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी तोडणे गरजेचे होते. ही साखळी तोडण्यासाठी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हाच एकमेव उपाय असल्याने एस टी वाहतुक बंद ठेवावी लागली होती.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोनाच्या संकटात अनेक वेळा एस टी ची चाके देखील लाॅकडाऊन च्या चक्रव्यूहात अडकल्याने एस टी चालक वाहक व कर्मचाऱ्यांना देखील अडचणीचा सामना करावा लागत आहे , महामंडळाकडून तोटा भरून काढण्यासाठी अनेक बसेस ला मालवाहतूक करण्यासाठी देखील परवानगी दिली गेली होती.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

दुसरी लाट ओसरत असल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा नुसार लालपरी पुन्हा एकदा जनसेवेसाठी तत्पर झाली असल्याची माहती करमाळा आगाराच्या आगार प्रमुख अश्विनी किरगत यांनी करमाळा चौफेर शी बोलताना दिली आहे . या वेळी अधीक बोलताना किरगत म्हणाल्या की राज्य परिवहन महामंडळाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच फेऱ्या बंद केल्या होत्या. दिनांक 01/06/2021 पासून बऱ्याच फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये टेंभूर्णी, बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूर सोलापूर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली असुन प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या मार्गावर आणखी बस सोडण्यात येतील

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

लालपरी पुन्हा एकदा नव्याने प्रवाशांच्या सेवेस तत्पर झाली असून प्रवाशांनी प्रवास करताना मास्क लावूनच प्रवास करावा. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक फेरीनंतर बस सॅनिटाइज करून पुढील फेरी साठी वापरण्यात येईल.महामंडळा कडून प्रवाशांची काळजी घेऊन च बससेवा सुरू करण्यात येत असून प्रवाशांनी मास्क व सॅनिटाइजर वापरून सहकार्य करावे व सुरक्षीत व आरामदायी प्रवासाठी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख अश्विनी किरगत, सहायक कार्यशाळा अधीक्षक श्री.आनंद रोमन, सहायक वाहतुक अधीक्षक कदम यांनी आवाहन केले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts