loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पार्टी करमाळा तर्फे मोफत म्युकर मायकोसीस तपासणी शिबिर संपन्न! ३९ रुग्णांची तपासणी

कोरोना संसर्गावर मात करून आलेल्या रुग्णासाठी पुढील काळजी म्हणून करमाळा शहर भाजपा आणि डॉ.अमोल घाडगे यांचे वरद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या म्युकर मायकोसीस मोफत चाचणी शिबिर आज संपन्न झाले . यावेळी शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, महादेव फंड आणि डॉ.अमोल घाडगे उपस्थित होते।

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

ज्या रुग्णांना डोळे दुखणे, जळ जळ होणे,तिरळेपणा जाणवणे,डोके जड होणे,दात दुखणे, हिरड्यातून रक्त किंवा पू येणे,नाकात श्वास घ्यायला त्रास होणे,नाकातून रक्त किंवा काळा स्त्राव येणे अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची या शिबिरामध्ये मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये एकूण ३९ रुग्णांची तपासणी करण्यात आली .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मा तालुकाध्यक्ष शशिकांत पवार,रेल्वे सल्लागार सदस्य दिपक चव्हाण,तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, मकाई कारखान्याचे मा संचालक अमोल पवार,युवा मोर्चाचे मयूर देवी,सहकार आघाडी चे सचिन चव्हाण,शहर उपाध्यक्ष आदित्य शहाणे,संजय गांधी निराधार चे नरेंद्र ठाकूर,संजय जमादाडे, मनोज कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts