loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धनगर आरक्षणाचा लढा तिव्र करणार-आण्णा सुपनवर

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर आरक्षणाचा लढा ग्रामीण भागातील वाडीवस्तीवर पोहचणार असुन या पुढे तिव्र आंदोलनचा पर्याय वापरावा लागला तरी माघार घेणार नाही असा ठाम निर्धार राष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब सूपनवर यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या बाबत अधीक माहीती देताना सुपनवर म्हणाले की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आदेशाने धनगर आरक्षणाच्या जनजागृतीसाठी तंतोतंत पालन करून करमाळा तालुक्यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आरक्षणाचे विचार घराघरांत पोहचवण्यासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती करमाळा तालुक्यामध्ये घरोघरी पारंपारिक वेश परिधान करून साजरी करण्यात आली.

गेली सत्तर वर्ष धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी जागर आंदोलन सुरू केलेले आहे त्याला करमाळा तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे इथून पुढच्या काळामध्ये गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जन आंदोलन उभा करू अशी माहिती शेवटी आण्णासाहेब सुपनवर यांनी दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts