खरं सांगायच तर दिदी माझ्या पेक्षा एक पाऊल पुढे आहेत आशी प्रांजळ कबुली युवा नेते दिग्विजय बागल यांनी दिली आहे. दिग्विजय यांच्या जेष्ठ भगीणी व तालुक्याच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांचा आज ३१ मे रोजी वाढदिवस असुन या वाढदिवसानिमित्त दिग्विजय बागल यांनी फेसबुक वर सविस्तर पोस्ट केली असुन या पोस्ट मध्ये दिदींचे भरभरून कौतुक केले आहे .करमाळा चौफेर च्या वाचकांसाठी आम्ही दिग्विजय बागल यांची पोस्ट प्रसारित करत आहेत.
दिदींबद्दल लिहिण्यासारखं खुप काही आहे. आज सहजच दिदींविषयी लिहावं असं वाटलं कारण आदरणीय स्व. मामांप्रमाणे दिदी ही सुद्धा माझ्यासाठी पॉवरहाऊस ठरल्या आहेत. स्व. मामांसारखे वडील आणि रश्मी दिदींसारखी बहीण लाभणे ही मोठी भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना रश्मीदिदी माझ्यामागे पहाडासारख्या उभ्या असतात. अडचणीच्या वेळी मार्ग दाखवण्यापासून ते माझ्या आवडत्या नावडत्या गोष्टींचीही त्यांना अचूक जाण असते. त्या चांगल्या कामासाठी पाठ थोपटतात तसंच काही चुकलं तर कानही पकडतात.
समाजकार्याचा वसा हाती घेऊन चालत असताना नेहमीच दिदींची मोलाची साथ आणि त्यांचे अमूल्य मार्गदर्शन मला कायमच लाभले. मामा गेल्यापासून पप्पांची कमतरता त्यांनी कधीच मला जाणवू दिली नाही नेहमी त्या सोबत असताना असं वाटतं जसं की स्व. मामा च माझ्या पाठीशी उभं राहून सर्व काही सांगत आहेत... लढवैय्येपणाची शिदोरी मामांकडून त्यांच्याकडे आली. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना मामांनी दिलेल्या योगदानाची कल्पना येते. एखाद्या अफाट सागराच्या किनारी उभे राहून त्याच्या जलविस्ताराची केवळ आपण कल्पनाच करु शकतो तसं स्व. मामांचे काम... स्व. मामांनी करमाळा तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावले जावे यासाठी अपार कष्ट केले. त्यांचे हे कार्य हा तालुका कधीही विसरु शकणार नाही. स्व. मामांच्या या कार्याच्या विस्ताराची रश्मीदिदींनीच मला ओळख करुन दिली आणि आता दिदींसोबत मलाही त्यातील खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळतेय हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. लहानपणापासूनच दिदी नेहमी माझ्यासाठी एक उत्तम मार्गदर्शक राहिल्या आहेत... मामांच्या अकाली निधनाने घर दुःखात असताना आई ने नेहमीच मामांची जागा घेऊन आम्हा दोघांना मायेने, संस्कारांनी मोठे केले. स्व. मामांचा दूरगामी विचारांचा वसा आणि आईच्या मायेच्या पदराखाली आम्ही दोघेही वाढलो. खरे सांगायचे झाले तर दिदी माझ्यापेक्षा एक पाऊल पुढे आहेत, ते त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे...! सर्वांना सामावून घेणाऱ्या कुटुंबवत्सल, सर्वांना अपार माया लावणारी मोठी बहीण, भाच्यांचे लाड पुरविणारी प्रेमळ आत्या अशी खूप रुपं दिदींमध्ये सामावली आहेत. राजकीय क्षेत्रात पहिल्यापासूनच जनमानसात मिसळण्याची वृत्ती असल्या कारणाने अल्वापवधीतच दिदींनी आपल्या कार्यकुशलतेने वेगळे स्थान निर्माण केले. जनतेमध्ये वावरताना जनतेची भाषा अगदी सहज दिदींच्या ओठावर असते. यातूनच त्यांची जनतेशी नाळ अधिक घट्ट झालेली मी पाहिली आहे. लहानपणी मी कधी चुकलो तर दिदी मला नेहमी ओरडायच्या, त्यांच्या डोळ्यादेखतच मी लहानाचा मोठा झालो. दिदी नेहमी मला ओरडायच्या खरं, पण त्या मनाने प्रचंड हळव्या आहेत. भाऊबीज किंवा रक्षाबंधन च्या वेळी "नको रे , राहू दे" असं सगळ्यांसमोर म्हणून दिदी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवतात खरं, पण नंतर एकट्यात गेल्यावर माझ्याकडूनच "माझं रक्षाबंधन/भाऊबीज चं गिफ्ट कुठे आहे ?" म्हणून त्याच माझा हाथ धरुन मागे लागतात.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.