loader
Breaking News
Breaking News
Foto

सामाजिक कार्यकर्त्ये सचिन मल्लव यांच्या कार्याला सलाम!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले जवळचे नातेवाईक गमवावे लागले ,कोणाचा भाऊ कोणाचा पती ,कोणाचे वडील,कोणाची आई,पत्नी, बहिण तर काही घरात दोन्ही सख्खे भाऊ,बाप लेक यांचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाच्या आपत्तिजनक परिस्थितीत अनेक जवळच्या लोकांनी संकटात साथ सोडली , पॉझिटिव्ह आलेल्या कुटुंबांना वाळीत टाकल्यासारखे झाले , माणसांबरोबरच हा करोना माणुसकीच संपवतो की काय आशी परिस्थितीती निर्माण झाली,मात्र कोरोनाच्या या काळात देखील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आप- आपल्या ताकदीनुसार कोरोनातील रुग्णांना मदत करण्याचे काम सुरु केले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सोलापूर येथील आशाच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सचिन मल्लव यांच्या कार्याचा सुद्धा उल्लेख करावा लागेल सामान्य कुटुंबातील असलेल्या सचिन मल्लव यांनी कोरोना काळात गरजुना शक्य होईल ती मदत उपलब्ध करुन असामान्य कार्य केले आहे. फक्त सोलापूर शहरातीलच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून सोलापूरात आलेल्या अनेक गरजुना ऑक्सिजन बेड मिळवून देण्याबरोबरच, जेवणाचे डब्बे पोहच करणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे काम आगदी मनापासून केले .कितीतरी अनोळखी लोकांना ज्यांना कधी पाहिले सुद्धा नाही अशा लोकांना देखील मदत उपलब्ध करून देवुन मानसिक आधार देण्याचे काम केले .मल्लव यांच्या मदतीमुळे अनेकांचे जिव वाचले ,अनेकांना आधार मिळाला ,रक्ताच्या नात्यांनी दुरावलं तरी सचिन मल्लव यांच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून आधार मिळाला.

कोरोनाच्या काळात अनेकांना संकटाचा सामना करावा लागला ते पाहून मन हेलावून जायचे अडचणीत मदत करु शकत नसेल तर काय उपयोग आसा प्रश्न मनाला पडायचा त्या मुळेच शक्य होईल तेवढी मदत करण्याचे ठरवले ,अनेकांना मदत देखील उपलब्ध करून दिली या काळात कुटुंबातील सदस्य, नगरसेवक डॉक्टर व मित्रपरिवार यांचे मोलाचे सहकार्य मिळाले या मुळेच मदत करु शकलो - सचिन मल्लव (सामाजिक कार्यकर्त्ये)

वैभव फरतडे ✍ (मुंबई प्रतिनीधी)

रुग्णसेवेबरोबरच घरात अडकुन पडलेल्या निराधार कुटुंबातील व्यक्तीला जेवणाचे,डब्बे, भाजीपाला पोहच करण्याचे काम आजही सुरु आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सचिन मल्लव यांच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी घडत असलेल्या माणुसकीच्या दर्शना मुळेच आज समाजात माणुसकी जिवंत राहिली आहे सामाजिक कार्यकर्त्ये सचिन मल्लव यांच्या सामाजिक कार्यास मनपूर्वक शुभेच्छा व सलाम

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts