केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सात वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त करमाळा भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात १०७ रक्तदात्यांनी रक्तदान केले .या वेळी गणेश चिवटे यांच्या वतिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस वाफ घेण्याचे यंत्र भेट देऊन सत्कार करण्यात आला . या रक्तदान शिबिराचे उदघाटन करमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप तर प्रमुख उपस्थिती म्हणून, पत्रकार अण्णासाहेब काळे, जयंत दळवी व आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन संतोष जाधव पाटील हे उपस्थित होते.
या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले की कोरोना सारख्या महासंकटात आपले एक आश्वासक पाऊल इतरांसाठी खूप आशादायी ठरते या उद्देशानेच या रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टीने केले असुन ,केंद्र सरकारच्या सात वर्षपूर्ती निमित्त पूर्ण भारत देशभर या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या कोरोना महामारीत समाजातील प्रत्येक व्यक्तीला फायदा होईल असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम यापुढेही आम्ही कायम करत राहू असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, विस्तारक भगवानगिरी गोसावी, तालुका सरचिटणीस सुहास घोलप, काकासाहेब सरडे,अमरजित साळुंखे ,राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड,उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब हौसिंग , तालुका उपाध्यक्ष दादासाहेब देवकर, डॉ.अभिजीत मुरूमकर , ओ बी सी मोर्चा चे तालुका सरचिटणीस भैय्याराजे गोसावी , मच्छिंद्र हाके,गौडरे चे डॉ. दिवाकर कुलकर्णी, चिखलठाणचे उपसरपंच दादासाहेब देवकर,वरकटणे सरपंच भगवान तनपुरे, बाळासो अनारसे, आध्यत्मिक सेल चे तालुकाध्यक्ष प्रदीप ढेरे महाराज , मा.महिला तालुकाध्यक्ष अश्विनी भालेराव,जिल्हाकार्यकारणी सदस्या राजश्री खाडे, चंपावती कांबळे , तालुका प्रसिद्धी प्रमुख जयंत काळे पाटील,युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष हर्षद गाडे, भय्या कुंभार, मनोज मुसळे,उदय भालेराव संदीप काळे, लक्ष्मण काळे आदीजन उपस्थित होते . या रक्तदान शिबिरास कुर्डूवाडी ब्लड सेंटरचे सहकार्य लाभले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.