loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरोना योद्ध्यांच्या मदतीने केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण वेगात

सध्या जिल्ह्यात कोरोना लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे पंरूतु करमाळा तालुक्यातील सर्वात मोठया समजल्या जाणाऱ्या केम गावात दररोजच्या दररोज जेवढे डोस येथील त्याचे लसीकरण व्यवस्थित पार पडत आहे याला कोरोना योध्दाची साथ मिळत आहे त्यामुळे केम येथे लसीकरणाला गती मिळत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व माजी सरपंच अजितदादा तळेकर यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या कोरोना प्रतिबंधक गोळया वैद्यकीय अधिकारी डाॅ संतोष पालखे,कोरोना योध्दे समीर तळेकर, सागर तळेकर यांच्या हस्ते आशा वर्कर याना वाटण्यासाठी देण्यात आल्या .

संजय जाधव (✍चौफेर प्रतिनिधी केम)

या वेळी समीर तळेकर म्हणाले कि आरोगय केंद्रामध्ये रोज लसीकरण केले जाते यास आमचे कोरोना योध्दे राजेंद्र तळेकर, दादा गोडगे, सागर तळेकर ,नवले यांची खंबीर साथ मिळत आहे हे कोरोना योध्दे आपला जीव धोक्यात घालून लसीकरणासाठि मदत करीत आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आजचे लसीकरण डाॅ संतोष पालखे यांच्या मार्गदर्शन खाली डाॅ विशाल जगदाळे , श्रीमती निलाबाई मेंगाळ आरोग्य सेविका, अभिजीत नवनाथ बागडे, समुदाय अधिकारी निलेश कुबेर, शितल घायल ,विकास डावखरे, महेश तळेकर, श्रीमती बगेँ आरोग्य सेविका श्रीमती स्वाती गोरे, गटप्रवतक व आशा वर्कर उपस्थितीत होत्या.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts