loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने किराणा मालाचे किट वाटप

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने करमाळा तालुक्यातील गोरगरीब गरजुनां किराणा मालाचे किट वितरीत करण्यात आले ,छत्रपती शासन हि सामाजिक कार्य करणारी संघटना असून महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्राणजीत भाऊ गवंडी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात सामाजिक कार्यक्रम राबवले जातात .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोरगरीब लोकांचा रोजगार बुडाला असून दररोज च्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे,हातावर पोट असलेल्या या गरजुना अन्नधान्याचे किट देवुन थोडाफार का होईना दिलासा देण्याचे काम छत्रपती शासन ग्रुप च्या वतीने करण्यात येत आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

छत्रपती शासन ग्रुपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली सरपडोह ता करमाळा जि सोलापूर येथे किराणा मालाच्या किट चे वाटप करण्यात आले.या वेळी बोलताना तनपुरे म्हणाले की छत्रपती शासन ग्रुपचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्राणजीत भाऊ गवंडी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात गरजुना मदत करण्याचे काम संघनटेच्या वतीने करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आम्ही करमाळा तालुक्यातील सरपडोह, फिसरे,वरकटणे,या गावात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी करमाळा तालुका अध्यक्ष विशाल पाटील, रणजीत देवकर, योगेश सुतार, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष,विशाल साबळे ,करमाळा तालुका उपाध्यक्ष हनुमंत रंदवे , नाथा गुगळे युवासेना करमाळा उपाध्यक्ष प्रसाद निंबाळकर नाथराव रंदवे, हनुमान रंदवे, छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य करमाळा तालुका उपाध्यक्ष अशोक रंदवे युवासेना करमाळा तालुका उपाध्यक्ष दसरथ देवकर , उत्तम गायकवाड ,सचिन गायकवाड ,आदर्श शिक्षक डौले सर, पप्पु पानसरे, विनायक पवार, चंदु पवार ,गोकुळ वाघमारे, व सर्व कार्यकर्त्ये उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts