loader
Breaking News
Breaking News
Foto

केम येथील महिलेचा सर्पदंशाने मृत्यु

करमाळा तालुक्यातील केम येथील पूजा जाधव वय 32 या विवाहित महिलेचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला आहे . हि गुरुवारी घडली असुन या बाबत सविस्तर माहिती अशी सदर महिला सकाळी अंघोळ केल्यानंतर डोक्याला तेल लावण्यासाठी खोबरेल तेलाची बाटली शोधण्यासाठी गेली असता , तेथील फळीवर असलेल्या विषारी सापाने हाताला दंश केल्याने तिला ताबडतोब केम येथील आरोग्य केंद्रात ऊपचारासाठी दाखल केले. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष पालखे यांनी तपासले असता पेशंटला करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात ताबडतोब दाखल करा असे सांगितले. परंतु पेंशटला करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात घेवुन जात असतानाच वाटेत निधन झाले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

पुजा जाधव या मयत झालेल्या महिलेची परिस्थिती अंत्यत गरीब असुन. तिला राहयला साधे घर सुद्धा नाही. ती गावात धुणे-भांडी करून उदरनिर्वाह करत होती. तिच्या पश्चात पती, सासु,सासरे, दोन दिर असा परिवार आहे.

संजय जाधव (✍चौफेर प्रतिनिधी केम)

या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे त्या कुटुंबाला ऊभे करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी आणि केम हे तालुक्यातील अत्यंत टोकाचे गाव आहे. केम प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सर्पदंशावर उपचार केम मध्येच झाले पाहिजेत. त्यामुळे सर्पदंशावर उपचार करण्यासाठी ज्या उपकरणांची व औषधांची गरज आहे ते केम येथे उपलब्ध करून द्यावेत. अशी मागणी केम येथील समाज सेवक अनिल तळेकर,व आशा वर्कर सुशीला जाधव यानी केली तसेचे यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी असी मागणी त्यानी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts