loader
Breaking News
Breaking News
Foto

गोरगरीब महिलांना किराणा किट देता येत नसेल तर चमकोगिरी करुन गरीबांची थट्टा केली म्हणून प्रवीण कटारिया यांनी माफी मागावी - संजय शिलवंत

शिवजयंतीच्या निमित्ताने उत्सव खर्च टाळून कोरोना च्या निमित्ताने गोरगरिबांना प्रत्येकी एक हजार रुपयाचे किराणा सामान दोनशे कुटुंबांना देणार अशी घोषणा शिवसेनेचे माजी शहर प्रमुख प्रवीण कटारिया यांनी करून फक्त प्रातिनिधिक स्वरूपात पाचच गरजू महिलांना किराणा साहित्याचे वाटप केले असुन उर्वरित १९५ महिलांना मात्र ठेंगा दाखवला आहे .कटारिया यांनी एक प्रकारे गरीब महिलांची थट्टा केली असुन गरजु महिलांना तात्काळ एक हजार रुपयाचे किराणा किट वाटप करा अन्यथा प्रसिद्धी साठी स्टंट बाजी केली आसे सांगुन जाहीर माफी मागावी आशी मागणी शिवसेना माजी शहरप्रमुख संजय शीलवंत यांनी केली प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिलवंत यांनी म्हटले आहे की प्रत्येकी एक हजार रुपयाचे किराणा सामान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे समोर तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे मुख्याधिकारी विणा पवार तहसीलदार समीर माने यांच्या साक्षीने फक्त पाच महिलांना दिले व उर्वरित 195 गरजू महिलांना लवकरच प्रत्येकी एक हजार रुपयांचे किराणा सामान देऊ अशी घोषणा केली. या कार्यक्रमाला तालुक्यातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित असल्यामुळे सर्व दैनिक वृत्तपत्रे सोशल मीडिया यातून याला मोठी प्रसिद्धी मिळाली मात्र गल्ली गल्ली मधून गरजू महिलांची नावे यादी तयार करण्यात आली होती त्या महिलांना वारंवार हेलपाटे मारून सुद्धा या गरजूंना किराणा किट मिळाली नाही. फोटोसह प्रसिद्धी मिळवल्यानंतर या पदाधिकाऱ्यांना आपल्या घोषणेचा विसर पडला आहे दोनशे जणांना किराणा देणार अशी घोषणा करायची व प्रसिद्धीचा स्टंट करून केवळ 5 किराणा किट वाटायचे हे अंत्यत लाजीरवाणे असल्याचे देखील शिलवंत यांनी म्हटले आहे

✍ चौफेर प्रतिनीधी

तात्काळ उर्वरित 195 गरजू महिलांना किराणा साहित्य द्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे प्रसिद्धीसाठी अधिकाऱ्यांच्या उपस्थित कार्यक्रम घ्यायचे व लोकांच्या डोळ्यात धूळफेक करायची खोटी प्रसिद्धी मिळवून जनतेची दिशाभूल करायची हा प्रकार निंदनीय असल्याची चर्चा शहरात सुरू आहे तरी घोषणा केल्याप्रमाणे प्रवीण कटारिया यांनी 195 गरजू महिलांना प्रत्येकी एक हजार रुपयाचे किराणा सामान द्यावे अन्यथा मी फुकट प्रसिद्धी घेतली व चमकोगिरी केली असे सांगून माफी मागावी तसेच किराणा साहित्याच्या वाटपाच्या नावाखाली देणगी गोळा केल्याची चर्चा आहे अशा या स्टंटबाजी मुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा आरोप शीलवंत यांनी केला आहे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शिलवंत यांच्या आरोपाला प्रवीण कटारिया यांनी एका न्युज पोर्टल शी बोलताना उत्तर दिले असुन त्यांनी म्हटले आहे की तालुका प्रमुख सुधाकर लावंड, संघटक संजय शिंदे,उपशहरप्रमुख पंकज परदेशी,उमेश पवार, महमंद कुरेशी यांच्या विचारविनिमयातुन लवकरच किराणा वाटपाचे नियोजन करणार आहे ..

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts