शेतकऱ्यांना डिझेल पेट्रोल साठी अडवणूक करण्याच्या कोणत्याही सुचना दिलेल्या नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची पेट्रोल पंप चालक व पोलीसांनी अडवणूक करु नये तसेच मि सर्वांना तात्काळ सुचना करतो असे आश्वासन जिल्हाधीकारी मिलिंद शंभरकर यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांना दूरध्वनीवर बोलताना दिले आहे. युवा सेनचे तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन पाठवले होते या अनुषंगानेच चिवटे यांनी जिल्हाधीकारी यांना फोन करून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणुन दिले.
अत्यावश्यक व शासकीय, वाहने,वैद्यकीय वाहने,अन्नधान्य वाहतूक करणाऱ्या वाहना व्यतिरिक्त इतर वाहनां पेट्रोल किंवा डिझेल देवु नका असा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला होता ,मात्र यामुळे शेतकरी, कोविड सेंटर, हाॅस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड आडवनुक होत होती.
मोटर सायकल वर ड्रम बांधून ट्रकट्रर जेसीबी साठी डिझेल आणावयास गेलेल्या शेतकऱ्यांना पेट्रोल पंप चालकांनी डिझेल तरच दिले नाही मात्र सालसे येथील इसार पेट्रोल पंपावर एका बिट हवालदाराने शेतकऱ्यांना प्रचंड दमबाजी करत पाचशे रु दंड ठोठावुन दोन ते अडीच तास आडकवुन ठेवले ,वडिलांच्या तेराव्या साठी फोटो घेऊन निघालेल्या एका व्यक्तीला दोन तास ताटकळत ठेवुन पाचशे रुपये दंड केला होता , शेतकऱ्यांवर झालेल्या या अन्यायाविरुद्ध युवा सेनेचे शंभुराजे फरतडे यांनी आवाज उठवला होता .
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.